हिवाळी ट्रेकिंगसाठी खुणावणारी काही उत्तम ठिकाणं! Winter Trek | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिवाळी ट्रेकिंगसाठी खुणावणारी काही उत्तम ठिकाणं! }

हिवाळी ट्रेकिंगसाठी खुणावणारी काही उत्तम ठिकाणं!

हिवाळा म्हटला, की वेध लागतात ते ट्रेकिंगचे. विविध गडकिल्ले, लेण्यांसारखी अनेक ठिकाणं आपल्याला खुणावतात. पण, पहाटेच्या गुलाबी थंडीत ट्रेक करण्याची मजा काही औरच असते. अशीच काही खास ठिकाणं नगर आणि पुणे जिल्ह्यात आहेत, त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

साधारण ट्रेकिंगचे तीन प्रकारात वर्गीकरण केले जाते. जसे की सोपा, मध्यम आणि हार्ड ट्रेक. सोपा ट्रेकमध्ये दोन-तीन दिवसांत करता येणाऱ्या ट्रेकचा समावेश होतो. मध्यम ट्रेकमध्ये चार ते सहा दिवस लागू शकतात. यामध्ये एका विशिष्ट पातळीवर तग धरण्याची गरज असते. या प्रकारातल्या ट्रेकमध्ये जास्त आव्हान असते. हार्ड ट्रेकमध्ये किती दिवस लागतील हे माहीत नसतं. शिवाय, येणाऱ्या अडचणी आणि समस्यांना सामोरे जाण्याची तयारी असली पाहिजे. थोडक्यात या प्रकारातला ट्रेक म्हणजे आपल्या सहनशिलतेची कसोटी पाहणारा ठरतो.

नगर जिल्ह्यात ट्रेकिंगची ठिकाणं...

जिल्ह्यात पर्यटन अन् ट्रेकिंगसाठी अनेक ठिकाणं आहेत. पण, नगर जिल्हा म्हटल्यावर डोळ्यांसमोर जी ठिकाणं येतात, त्यापैकी कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, रतनगड हे अग्रस्थानी आहेत असं म्हणता येईस. या ठिकाणांबद्दल आपल्याला थोडंफार माहिती असेलही, मात्र अजून माहिती जाणून घेणार आहोत. यांच्यानंतर ज्या 'एएमके'चा उल्लेख होतो. ते एएमके म्हणजे अलंगगड, मदनगड आणि कुलंगगड यांच्याविषयी देखील जाणून घेणार आहोत. चला तर मग...

कळसूबाई शिखर

- अकोलेपासून 41.7 किलोमीटर अंतरावर

- महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर म्हणून कळसूबाई शिखराचा लौकिक

- समुद्र सपाटीपासून शिखराची उंची 1646 मीटर इतकी

- पायथ्याच्या बारी गावातून शिखराची उंची अंदाजे 900 मीटर

- गावकऱ्यांनी अर्ध्या उंचीपर्यंत पायऱ्यांची शेती केलीय

- गावाबाहेरचा ओढा ओलांडून थोड्याच अंतरावर एक मंदिर लागते

- मंदिराच्या मागच्या बाजूने जाणारी वाट थेट शिखर माथ्यापर्यंत जाते

- कठीण कातळ टप्प्यांवर तीन ठिकाणी शिड्या बसविल्या आहेत

- साधारण तीन ते चार तासांत शिखर सर करणे सहज शक्य

- शिखरावर राहण्याची सोय नाही, शिखराखालील शेड किंवा भंडारदरा किंवा बारी गावात राहता येईल

- बारी गावात किंवा भंडारदऱ्याला जेवणाची सोय होते, तसंच शिखरावर विहिरीलगत चहा-भजी उपलब्ध

- याशिवाय जवळच भंडारदरा धरण, रंधा धबधबा, कोकणकडा इत्यादी ठिकाणं पाहण्यायोग्य

- मुंबई-कसारामार्गे घोटी गाठावे

- घोटी-सिन्नर मार्गावर भंडारदरा फाटा आहे

- या फाट्यावरून भंडारदर्‍याला जातांना, भंडारदर्‍याच्या अलिकडे ६ किमी अंतरावर बारी गाव

- संगमनेरपासूनही भंडारदरामार्गे बारी गावास जाता येते

हरिश्चंद्रगड

- खिरेश्वरपासून आठ किमी, अकोलेपासून 43.8 किमी, भंडारदरापासून 50 किमी, तर पुण्यापासून 166 किमी अंतरावर

- हरिश्चंद्रगड हे ट्रेकिंगसाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध

- किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून 1424 मीटर

- किल्ला पुणे, ठाणे आणि नगर या जिल्ह्यांच्या सीमेवर

- जिथे जिल्ह्यांच्या सीमा एकत्र येतात, तेथून सह्याद्रीची एक उपरांग पूर्वेकडे धावते; तिची हरिश्चंद्राची रांग म्हणून ओळख

- रोहिदास, तारामती आणि हरिश्चंद्र हे हरिश्चंद्रगडामधील तीन शिखरे आहेत

- गडावर जाण्यासाठी सध्या तीन ते चार वाटा प्रचलित आहेत

- गड सर करण्यासाठी एक सावर्णे-बेलपाडा-साधले असा घाटमार्ग

- हा मार्ग फारच अवघड असून प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असलेल्यांनीच हा मार्ग अवलंबावा

- या मार्गे येण्यासाठी कल्याण-मुरबाड मार्गे माळशेज घाट चालू होण्यापूर्वी सावर्णे गावात उतरावे

- पुढे बेलपाडा या कोकणकड्याच्या पायथ्याच्या गावात यावे, तेथून साधले घाटाच्या साहाय्याने कोकणकड्याच्या पठारावर जाता येते

- या वाटेने मंदिर गाठण्यास सुमारे दीड दिवस लागतो, या वाटेलाच 'नळीची वाट' असंही म्हणतात

- हरिश्चंद्रगडावर जाण्याची एक वाट पाचनईमार्गे नगर जिल्ह्यातूनही आहे, यासाठी मुंबई-नाशिक रस्त्यावरील घोटी गावात उतरावे

- पुढे संगमनेर मार्गावरील राजूर गावात जावे, राजूरवरून गडावर दोन मार्गांनी चढाई करता येते

- पाचनई हे गडाच्या पायथ्याचे गाव असून, येथून गड गाठण्यास सुमारे तीन तास लागतात; वाट फारच सोपी आहे

- पाचनई ते हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर हे ६ किमी अंतरावर

- गडाचं विशेष आकर्षण म्हणजे पश्चिमेकडे असलेला कडा

- हरिश्चंद्रगडावरून शिवनेरी, हडसर, चावंड, निमगिरी, सिंदोळा, जीवधन, गोरखगड, मच्छिंद्र, सिद्धगड, माहुली, कलाडगड, भैरवगड, (मोरोशी), भैरवगड (शिरपुंजे), कुंजरगड हे किल्ले दिसतात

रतनगड

- अकोलेपासून 46.7 किमी अंतरावर

- गडाची उंची समुद्रसपाटीपासून ३५२३ फूट

- गडावर जाण्यासाठी पायथ्याशी रतनवाडीला पोहोचायला हवे

- रतनवाडीस संगमनेरहून अकोले-राजुर-भंडारदरा मार्गे जाता येते

- गडावर राहाण्यासाठी दोन गुहा असून, पाणी उपलब्ध

- गडावरील गुहांमध्ये अंदाजे ३० ते ३५ लोक राहू शकतात

- गडावर खाण्याची सोय नाही

- गडावर पाण्याची टाके आहेत, त्यातील काही पिण्यायोग्य आहे

- कल्याण दरवाज्याजवळ झरा आहे

- गडावर जाण्यासाठी तीन वाटा आहेत ः १) रतनवाडीहून २) कुमशेतहून शिवकालीन मार्गाने ३) साम्रदहून मार्गे

अलंगगड

- अकोलेपासून 55.4 किमी अंतरावर

- अलंगगड सह्याद्रीच्या उपरांगामधील कळसूबाईची उपरांग

- या रांगेमध्ये आड, औढा, पट्टा, बितन, अलंग, मदन, आणि कुलंग असे एकापेक्षा एक वरचढ किल्ले आहेत

- हा किल्ला प्रवरा नदीच्या खोऱ्यात आहे

- किल्लेप्रेमींचे आकर्षण ठरलेले अलंग, कुलंग आणि मदन हे त्रिकुट याच खोऱ्यात

- येथे कळसूबाई रांग नाशिक आणि नगर या जिल्ह्यांच्या सीमेवर उभी आहे

- नाशिककडे म्हणजे उत्तर बाजूला ईगतपूरी तालूका, दक्षिण बाजूला नगरमधील अकोले तालुका अन् अकोले तालुक्यामधील भंडारदराचे धरण प्रसिद्ध

- रंधा धबधबा, भंडारदरा व अमृतेश्वर मंदिर पहाण्यासाठी पर्यटक या परिसराला भेट देतात

- शिवाय मोजकेच पर्यटक या भागातील दुर्गम किल्ल्यांना भेटी देतात

- भंडारदरा धरणाच्या मागे म्हणजे पश्चिमेला घाटघर गाव असून, गावापर्यंत गाडीरस्ता

- घाटघर हे अलंगगडाच्या पायथ्याशी वसलेलं गाव

- तीनशे ते चारशे मीटर उंचीचे कातळमाथे असणारे अलंग, कुलंग आणि मदनगडाचे दर्शन उरात धडकी भरवणारे

- घाटघरमधून वाटाड्या घेणे सोईस्कर, सोबत पाणीही न्यावे

- घाटघरपासून तीन किमी चालल्यावर अलंगगडावरून उतरणार्‍या एका दांडाजवळ पोहोचतो

- या पदरात जंगल असून, झाडांबरोबर झुडुपेही आहेत

- कातळमाथ्याला एक लहानसा सुळका आहे, तेथून डावीकडे तिसर्‍या ओहोळाजवळ गडावर जाणारा मार्ग

- काही पायर्‍या तुटल्यामुळे हा भाग काहीसा अवघड

- येथे दोराचा वापर आवश्यक आहे, बुजलेल्या दरवाजाच्या बाजूने आपण गडप्रवेश करतो

- हा मार्ग कातळकड्याच्या मध्यातून जात असल्याने डावीकडे दरी आणि उजवीकडे कातळमाथा

- किल्ल्याचा माथा फिरण्यास चार तास लागतात

मदनगड

- अकोलेपासून 57 किमी अंतरावर

- हा गड अत्यंत कठीण

- किल्ला प्राचीन असून तेवढाच दुर्गम आहे

- डिसेंबर व जानेवारी हे दोन महिने या परिसरात भटकंतीसाठी योग्य

- अलंग, मदन व कुलंग या तीनही किल्ल्यांचा ट्रेक एकत्र केला जातो

- गडावर पाण्याची दोन टाकी, त्यात फेब्रुवारीपर्यंतच पाणी असते- गडावर २० ते ३० जणांना राहता येईल एवढी गुहा

- मदनगडावरून अलंग, कुलंग ,छोटा कुलंग, रतनगड, आजोबा गड, कात्राबाई ,डांग्या सुळका ,हरिहर, त्रिबंकगड हे किल्ले दिसतात

- गडफेरीस अर्धा तास लागतो.
- गडावर जाण्यासाठी दोन मार्ग, दोन्ही अलंग आणि मदनच्या खिंडीतूनच जातात 1) आंबेवाडी मार्गे, 2) घोटी-भंडारदरा मार्गे घाटघर

- गडमाथा गाठण्यास प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असणे आवश्यक

- १०० फूटी रोप व इतर गिर्यारोहणाचे सामान सोबत असावे

कुलंगगड

- अकोलेपासून 57 किमी अंतरावर

- कळसूबाई शिखराच्या पश्चिमेला हा किल्ला

- कुलंगगडाच्या उत्तर पायथ्याला कुरंगवाडी गाव

- ईगतपुरीहून पिंपरी सद्रुधिन मार्गे येथे पोहोचता येते

- कळसूबाईच्या पायथ्याच्या वारी घाटातून खाली उतरल्यावर इंदोरे मार्गे आंबेवाडीला पोहोचता येते

- आंबेवाडीकडूनही कुलंगगडाचा पायथा गाठता येतो

- १४७० मीटर उंचीच्या कुलंगगडावर पोहोचण्यासाठी प्रथम खालच्या पदरात पोहोचावे लागते

- या पदरात पोहोचण्यासाठी कुरंगवाडीतून दोन तास वाटचाल करावी लागते

- मदनगड व त्या शेजारील सुळके आणि कुलंगचा कातळकडा मनात धडकी भरवणारा

- कुलंगच्या उजव्या बाजुने उतरणारा डोंगरदांड दिसतो

- या डोंगरदांडावरूनच कुलंगची चढाई करावी लागते

- कुलंगच्या कड्याला पोहोचल्यावर कातळकोरीव पायऱ्या आहेत

- या पायऱ्या चढून दारातून गडप्रवेश करता येतो

- कुलंगगडावर पाण्याची अनेक टाकी असून त्यातले पाणी स्वच्छ व पिण्यायोग्य

- या गडावरून पाबरगड, रतनगड, कायाबाई, भैरवगड, हरिश्चंद्र, सिद्धगड, तसेच स्वच्छ हवामानात माथेरान, पेण, चंदेरी, मलंगगड आणि माहुलीची रांगही न्याहाळता येते

- कुलंगगड पहाण्यासाठी पूर्ण एक दिवसाचे नियोजन आवश्यक

पुणे जिल्ह्यात ट्रेकिंगची ठिकाणं...

* किल्ले

- लोहगड, विसापूर, तुंग, तिकोणा, राजमाची

* लेणी

- कार्ला, भाजे, बेडसे, येलघोल, पाटण, पाले- उकसान, कांब्रे, पद्मावती, शिलाटणे


* इतरही काही ठिकाणे...

भातराशी, कामशेत टॉवर व बेडसे येथील वाघेश्वर मंदिर, मावळ व खेड तालुक्याला जोडणाऱ्या सह्याद्रीवरील वरसुबाईचे प्राचीन मंदिर, वडेश्वर येथील सटवाईदेवी मंदिर, ढाकबहिरी गड, मावळ- मुळशीच्या सीमेवर असणारा मोरगिरी किल्ला, चिखलसे येथील जानुबाई मंदिर, तळेगाव येथील चौराई देवी मंदिर, नाणोली- साई पवनचक्क्या व नाणे- करंजगाव पठार. राजमाची किल्ल्याच्या पलीकडे म्हणजे कर्जत तालुक्यात येणारी कोंढाणे लेणी. घोरावडेश्वर लेणी, पीर डोंगर, फिरंगाई देवी मंदिर व लेणी, नाणोली तर्फे चाकण, तासूबाई मंदिर कल्हाट आणि लेणी, ऐतिहासिक उंबरखिंड, ड्युक्स नोज (नागफणी) लोणावळा, तसेच भीमाशंकर ट्रेकही मावळ भागातून करता येतो.


* ट्रेकिंगला जाताना ही घ्या काळजी...

- तुम्ही ज्या भागात जाल, तिथली व्यवस्थित माहिती घ्या
- नियमीत ट्रेक करणारे ट्रेकर्स असतील, त्यांनाही विचारा
- ट्रेकर्सकडनं संबंधित ठिकाणाची इत्यंभूत माहिती घ्या
- सोबत काय-काय घ्यायचे ते निश्तित करा
- प्रवासासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणार असालं, तर त्याच्या वेळापत्रकाचे पालन करा
- खासगी वाहन नेणार असाल, तर वाहनाचे सर्व्हिसिंग करून घ्या
- निघण्याचे आणि परतण्याचे वेळापत्रक इतर सहकाऱ्यांनाही देऊन ठेवावे