कसे आहे छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ!

पुणे जिल्ह्यातील पुरंदरचे प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ
कसे आहे छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ!

पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रस्तावित आहे. या विमानतळाला छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्यात आले आहे. नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर पुरंदरचे हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे राज्यातील दुसरे विमानतळ असणार आहे. या विमानतळाच्या माध्यमातून पुरंदरचे नाव जगभरात पोचणार आहे. याशिवाय तालुक्‍याचा आणि पर्यायाने पुणे जिल्ह्याचा आर्थिक, सामाजिक विकास होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर दळणवळणविषयक अन्य सुविधांचीही त्यात आणखी भर पडेल. म्हणजेच हे विमानतळ खऱ्या अर्थाने पुरंदर तालुक्‍याच्या आणि पर्यायाने पुणे जिल्ह्याच्या विकासाचे ‘टेक ऑफ' ठरणार आहे.

पुरंदर तालुक्यातील नियोजित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून गाजतो आहे. पूर्वी खेड तालुक्‍यातील चाकण किंवा राजगुरुनगर येथे या विमानतळाचे नियोजन होते. मात्र, तेथील शेतकऱ्यांनी या विमानतळासाठी आवश्‍यक असलेली जमीन देण्यास नकार देत, या विमानतळाला कडाडून विरोध केला. त्यामुळे राज्य सरकारने गेल्या वर्षी हे नियोजित विमानतळ पुरंदर तालुक्‍यात करण्याचा निर्णय घेतला. छत्रपती संभाजीराजे यांचा जन्म हा पुरंदर किल्ल्यावरचा असल्याने, या विमानतळास त्यांचेच नाव देण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com