Love Story : ५६ वर्षांची मी आणि ३६ वर्षांचा तो..! रिटायरमेंटच्या वयात सुरू झाली मुंबईची प्यारवाली लव्ह स्टोरी

२८ वर्षांचा संसार.. सर्व काही ठीक चाललेलं आणि एक दिवस...
20 year age gap Mumbai love story
20 year age gap Mumbai love story Esakal

मुंबई: प्राण्यांसाठी असणाऱ्या एनजीओमध्ये जेव्हा मी माझ्या भाचीसोबत गेले त्यावेळी तिथे मला निखिल भेटला. त्याने मला ओळखलं. तो म्हणाला तुम्ही गीता हिंदुस्थानी ना? मी ओळखतो तुम्हाला. मी तुमच्या पोस्ट वाचायचो.. त्यावेळी भारतात मला अजूनही इतके लोक ओळखतात हे ऐकून फार आनंद झाला.. निखिल माझा भारतात परतल्यानंतर पहिला मित्र बनला..

५६ वर्षीय गीता आपल्या २८ वर्षांच्या संसाराविषयी सांगताना जेवढ्या व्यथित होतात तेवढ्याच नव्याने सुरु झालेल्या आयुष्याविषयी, नव्या नात्याविषयी मात्र भरभरून बोलतात.. त्या सांगतात वयाच्या ५० व्या वर्षात जिथे लोक निवृत्तीची स्वप्न पाहतात तिथे ३६ वर्षीय निखिल आणि त्याच्या कुटुंबाच्या रूपाने माझी सेकंड इनिंग सुरु झाली आहे. आज मी खूप खुश आहे.. देवाकडे फक्त एकाच प्रार्थना आहे, जशी माझ्या पहिल्या लग्नाला नजर लागली आणि सगळं होत्याचं नव्हतं झालं तसं आता होऊ नये..

20 year age gap Mumbai love story
20 year age gap Mumbai love story Esakal
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com