इंस्टाग्रामवर रिल्स करणं पडलं महागात...!

इंस्टाग्रामवर रिल्स करणं पडलं महागात...!

Published on

दोघेही अनाथ. त्यांची ओळख झाली. प्रेमाचे रूपांतर विवाहात झाले. त्यानंतर काही वर्षांनी त्याने नवीन लाँड्री व्यावसाय सुरु केला. व्यवसायात जम बसल्यानंतर पतीने पत्नीला स्मार्टफोन हौसेने खरेदी करुन दिला. सोशल मीडियाचे अज्ञान असलेल्या पत्नीने इंस्टाग्राम डाउनलोड केलं. रिल्स पण तयार केले. त्यानंतर मोबाईलवर काही दिवसांत मेसेज येवू लागले. लिहिता आणि वाचता येत नसूनही व्हाइस टायपिंग शिकून तिने व्हिडिओ कॉल आणि चॅटिंगला सुरुवात केली. त्यानंतर, एका अज्ञात व्यक्तीशी मैत्री झाली. त्याने तिला विश्वासात घेऊन भेटण्याचे ठरविले. त्या दिवसानंतर ती घरी परतली. पण घडले ते भलतेच...

मूळचे उत्तरप्रदेशातले व सध्या पिंपरी-चिंचवडमधील सांगवीत राहणारे दांम्पत्य. त्यांना हा अनुभव आला आहे. शेवटी पतीला समजलं की, इंस्टग्रामवरुन पत्नीची मैत्री झालेल्या इसमाने तिला ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी केली आहे. पोलिस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनीही पतीला वेड्यात काढलं. शेवटी, त्याने काही मित्रांच्या कानावर घडलेला प्रकार घातला आणि पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. सध्या असेच वेगवेगळे अनुभव सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांना येत आहेत.

लाइक्स आणि कंमेट्सच्या हव्यासापोटी कोण कुठल्या पातळीला जाईल याची शाश्वतीच राहिली नाही. काही दिवसांपासून थेरगाव क्वीन सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. त्यासारखे ५० च्यावर बनावट अकाउंट पोलिसांना सापडले आहेत. त्यावर अर्वाच्च भाषा व अश्लील शिवीगाळ वापरलेली आहे. एक प्रकारे ही स्टंटबाजी आणि लाइक्स व कमेंटस मिळविण्याचे फॅड आहे. मात्र, महिलांना पुसटशी कल्पना नाही की, गुन्हेगार सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना टार्गेट करीत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com