पुणेरी पाट्यांचा आद्य जनक; स्टेडियमपेक्षा उंच मचाण बांधून केली होती कॉमेंट्री

पुणेरी पाट्यांचा आद्य जनक; स्टेडियमपेक्षा उंच मचाण बांधून केली होती कॉमेंट्री

Published on

पुण्यनगरीला पाट्यांचे शहर म्हंटले जाते. पुणेकरांचे बौद्धिक कौशल्य, टोमणे, उपदेश या सर्वांचा एकत्रित आस्वाद घ्यायचा असेल तर तुमच्यासमोर एक उत्तम पर्याय म्हणजे ‘पुणेरी पाट्या’. कमीतकमी शब्दांत जास्तीतजास्त ‘अवहेलना’ करून घेण्याची हमखास जागा म्हणजे सदाशिव पेठ, पुणे. आता ही पुणेरी पाट्यांची पद्धत कोणी सुरू केली या इतिहासाबद्दल अस्सल पुणेकर वाद बराच घालतील, पण पहिली फेमस पाटी कोणी लावली तर प्रभाकर बाळकृष्ण जोग म्हणजेच प्र. बा. जोग यांनी, असे सांगितले जाते. (Puneri Patya)

विद्वान माणूस विक्षिप्त असतो असे म्हणतात, पुणे तर विक्षिप्त लोकांनी भरलेले शहर आहे, अशी अन्य शहरातील लोकांची धारणा! प्र. बा. जोग हे या सगळ्या विक्षिप्त पुणेकरांचे बादशहा होते. ते मूळचे वकील. शिवाय क्रिकेट सामन्याचे अंपायर, पट्टीचे वक्ते आणि वर राजकारणीसुद्धा, पण त्यांचा सगळ्यात आवडता छंद ‘भांडणे’ हा होता. पेशाने ते वकील, त्यात सदाशिव पेठ, त्यात भांडण्याची खुमखुमी असलेले. म्हणजे किती जालीम रसायन असेल याची कल्पना करा.

भांडण्यासाठी त्यांना कोणतेही कारण पुरायचे. अगदी लाकडी जिन्यावरून चालताना आवाज झाला किंवा गवळ्याने चरवी जोरात आदळली या कारणाने देखील त्यांची भांडणे व्हायची, पण ही सगळी भांडणे मारामाऱ्या टाइप नसून तात्विक असायची.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com