गोमूत्रातील घटकांचे प्रमाण विविध स्थितीत वेगवेगळे; संशोधनाचा निष्कर्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोमूत्रातील घटकांचे प्रमाण विविध स्थितीत वेगवेगळे; संशोधनाचा निष्कर्ष}
गायीच्या गोमूत्रातील घटकांचे प्रमाण विविध स्थितीत वेगवेगळे; संशोधनाचा निष्कर्ष

गोमूत्रातील घटकांचे प्रमाण विविध स्थितीत वेगवेगळे; संशोधनाचा निष्कर्ष

गायीचे गोमूत्र हे औषधी आहे. त्यामुळे यामध्ये असणारे घटक जाणून घेणे तितकेच गरजेचे आहे. वासरू, दुभती गाय आणि गाभण गायीच्या या अवस्थामध्ये गोमूत्रामध्ये आढळणाऱ्या घटकांचे प्रमाणही भिन्न असते. यावर संशोधकांनी अभ्यास करून त्याचे प्रमाण मांडले आहे. याबद्दल माहिती देणारा हा लेख...

जनागड कृषी विद्यापीठामध्ये १२ देशी गीर गायींची गोमूत्रावर संशोधन करण्यात आले. यामध्ये वासरू, दुभती गाय आणि गाभण राहिलेली गाय यांचा समावेश होता. जवळपास सुमारे चार आठवडे गोमूत्रातील घटक तपासण्यात आले. यात गाभण गायीमध्ये युरिया, फिनॉल आणि अमिनो अॅसिडचे प्रमाण दुभत्या गायीपेक्षा जास्त असल्याचे आढळले. जुनागडच्या बायोकेमेस्ट्री विभागातील एच. आर. रामाणी, एन. एच. गारनिया आणि बी. ए. गोलकिया या संशोधकांचा या संदर्भात एक शोधनिबंध प्रकाशित झाला आहे. तसेच याच संदर्भात यवतमाळ येथील केमिकल इंजिनिअरिंग विभागाच्या सुमित अडे, विनय काथोले, समित खानगर, राहुल ताकपे यांचाही शोधनिबंध प्रकाशित झाला आहे.

हेही वाचा: आळंदीतील अपरिचित धार्मिक स्थळे आणि पर्यटन केंद्र

भारतामध्ये गीर गायही सर्वाधिक दूध देणारी गाय म्हणून परिचित आहे. या गायीच्या गोमूत्रामध्ये औषधी गुणधर्म असल्याने याचा वापर प्राचीन काळापासून औषधामध्ये केला जात आहे. वेदांमध्ये गायीच्या गोमूत्राची तुलना अमृताशी केली आहे. शुस्रुतामध्येही गोमूत्राचे अनेक औषधी गुणधर्म नोंदविण्यात आले आहेत. वजन कमी करण्यासाठी, तसेच हृदयविकार आणि किडनीच्या समस्या, अपचन, पोटदुखी आदी विकारांवर उपयुक्त असल्याची नोंद आढळते. गोमूत्र, दूध, तूप, दही आणि शेण यांचे मिश्रण ज्‍याला पंचगाव्य असे संबोधले जाते याचा वापर अनेक दुर्दर आजारावर केला जातो. अॅलोपॅथीने बरे न होणारे आजार या पंचगाव्यने बरे होतात. युरियाचे प्रमाण गाभण गायीमध्ये सर्वाधिक आढळते. त्या खालोखाल दुभत्या गायीमध्ये आणि वासरुमध्ये आढळते.

हेही वाचा: फिर्यादी किंवा वकिलांचे कोरोनामुळे निधन झाले तर त्यांच्या दाव्याचे काय?

गोमूत्रामध्ये आढळणारे घटक कालवड गाभण गाय दुभती गाय
युरिया (ग्रॅम) १.०७ २.१६ १.९६
फिनॉल २१.९३ २८.३७ २५.०
युरिक अॅसिड ३६.३७ ३४.५० ४०.७५
अमिनो अॅसिड ९१.६८ १७२.०० १४६.०६

टॅग्स :cow urine