
सुनील चावके
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, उत्तराखंडप्रमाणे मनास वाटेल त्याला मुख्यमंत्री करण्याचे लहरी प्रयोग भाजपश्रेष्ठींना महाराष्ट्रात करणे परवडणार नाही. आज महाराष्ट्राचा कारभार दिल्लीतील भाजपश्रेष्ठींच्या इशाऱ्यावर चालत असला तरी गेल्या पाच वर्षांत राज्यातील महाघोळासाठीही तेच कारणीभूत ठरले आहेत.