Narendra Modi
Narendra Modisakal

मोदीविरोधी टीकेचे अस्त्र बोथट का ठरते?

२०१४ नंतर सातत्याने दणके बसूनही कॉंग्रेस पक्ष अद्यापही कामाला का लागत नाही, हा प्रश्‍न अनेकांना पडला आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर काँग्रेस पक्षाच्या (congress news) घसरणीची चर्चा सुरू आहे. या पक्षाच्या आमूलाग्र पुनर्रचनेची गरज असल्याचे जो तो सांगू लागला आहे. वास्तविक एखाद्या धक्‍क्‍याने व्यक्ती वा संस्था अंतर्मुख होते. स्वतःमध्ये बदल घडवून आणते. आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी करते; पण २०१४ नंतर सातत्याने दणके बसूनही हा पक्ष अद्यापही झडझडून कामाला का लागत नाही, हा प्रश्‍न अनेकांना पडला आहे. त्याचे उत्तर कदाचित नजीकच्या भविष्यकाळात मिळेलही; पण त्याहीपेक्षा एक महत्त्वाचा प्रश्‍न विचारात घ्यायला हवा, तो म्हणजे मोदीविरोधी टीकेचा परिणाम का होत नाही? हे मी काँग्रेसकडून मोदी सरकारवर होणाऱ्या शाब्दिक हल्ल्यांविषयी म्हणत नाही. याचे कारण राजकीय विरोधकांकडून होणारा घणाघात, निर्भर्त्सना हे सगळे संसदीय लोकशाहीत, त्यात अभिप्रेत असलेल्या स्पर्धेत अपेक्षित असते; पण मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांच्यावर होणारा टीकेचा भडिमार हा केवळ राजकीय पक्षाकडून होतो, असे नाही. शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत, पत्रकार, अभ्यासक, कलावंत, स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून काम करणारे कार्यकर्ते यांपैकी अनेक जण सत्ताधाऱ्यांच्या धोरणांविषयी अतिशय परखड आणि चिकित्सक भाष्य करू शकतात. तसा ते करतही आहेत. प्रश्‍न आहे तो त्याची परिणामकारकता हरवण्याचा. धोरणात्मक चर्चा लोकशाहीत आवश्‍यकच असते. त्यातून लोकमताचा रेटा तयार होतो आणि निर्णयप्रक्रियेवर अंकुशही राहतो. सध्या तशी चर्चा जवळजवळ बंद पडली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com