

Women employment
esakal
भारत आज जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे, परंतु या प्रगतीच्या प्रवासात एक गंभीर आणि वेदनादायी वास्तव म्हणजे भारतातील महिलांच्या बेरोजगारीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.
भारत सरकारने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, महिलांच्या बेरोजगारीचा दर केवळ एका महिन्यात ५.२% वरून ५.५% वर पोहोचला आहे. ही आकडेवारी केवळ काही टक्क्यांची वाढ नाही, तर ती देशाच्या अर्ध्या लोकसंख्येच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना आहे.
विशेष म्हणजे, शहरी भागात ही परिस्थिती अधिक गंभीर आहे. ऑगस्टमधील ८.९% वरून सप्टेंबरमध्ये शहरी महिलांची बेरोजगारी ९.३% पर्यंत पोहोचली आहे. म्हणजे शिक्षण, कौशल्य आणि संधी यांचं प्रमाण जास्त असलेल्या शहरांतही महिलांना काम मिळणं कठीण झालं आहे. बेरोजगारी वाढत असताना श्रमबल सहभाग दर (LFPR) म्हणजे काम शोधणाऱ्या किंवा काम करणाऱ्या लोकांचा टक्का मात्र ५५.३% वर पोहोचला आहे. म्हणजेच लोक अधिक प्रमाणात कामाच्या शोधात आहेत, पण रोजगार निर्माण होण्याचं प्रमाण त्या वेगानं वाढत नाहीये.
अर्थव्यवस्थेचा आकार दिवसेंदिवस वाढत असताना महिलांच्या हाताला काम का मिळत नाहीये? ग्रामीण आणि शहरी भागात रोजगाराबाबतीत इतका फरक का दिसतोय? LFPR वाढणं म्हणजे प्रगतीचा संकेत की बेरोजगारीचं संकट? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिलांना खऱ्या अर्थानं रोजगार देण्यासाठी भारताने पुढे कोणती पावले उचलायला हवीत? हे सगळं जाणून घेऊया सकाळ+ च्या या लेखातून.