Premium| Pune Grand Tour 2026: पुण्यातील अतिभव्य सायकल स्पर्धेमुळे जागतिक नकाशावर अवतरणार पुण्याचे नाव

UCI cycling race India: महाराष्ट्रात सायकलिंगचा वेग वाढत असताना पुणे ग्रँड टूर २०२६ ही भारतातील पहिली UCI मान्यताप्राप्त बहु टप्प्यांची स्पर्धा ठरणार आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या नेतृत्वात ही ४३७ किलोमीटरची शर्यत जागतिक दर्जाची ठरेल
Pune Grand Tour 2026

Pune Grand Tour 2026

esakal

Updated on

पुण्यातच नव्हे तर महाराष्ट्रभरात सायकल चालवण्याचा आनंद घेणाऱ्यांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढली आहे. ट्रायथलॉन खेळ प्रकारात भाग घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या खेळ प्रकारात भाग घेणाऱ्यांना पळणे, पोहणे आणि सायकलिंग तीनही गोष्टी कराव्या लागतात. सर्वात आनंदाची बाब अशी, की सायकलप्रेम वाढत असताना पुण्यात अतिभव्य सायकल स्पर्धा घेतली जाणार आहे. मला या स्पर्धेचे खूप फायदे दिसत आहेत.

या घटनेला काही वर्ष होऊन गेली. ओझोन व्हेंचर्सचा माझा मित्र मिहिर गोगटेनी मला त्याच्या सायकलच्या दुकानात बोलावले होते. एका खास माणसाला तुम्हाला भेटवतो, इतकाच निरोप त्याने दिला होता. मी त्याच्या दुकानात गेलो तर एक माणूस त्याची सायकल दुरुस्त करून घेत होता, त्याचे नाव होते हरनानी कार्डोसो. हा माणूस कुठून आला होता माहीत आहे तुम्हाला...? पोर्तुगालहून आणि चालला कुठे होता...? चीनला. कारण काय होते समजल्यावर मी हबकलो, वेडा झालो.

झाले असे होते, की एक चीनचा एरिक फेंग नावाचा सायकलिस्ट १८ हजार किलोमीटर सायकल चालवून पोर्तुगालच्या घरी एक रात्रीसाठी राहायला आला. अशा राहण्याच्या व्यवस्थेला युरोपच्या भागात ‘शॉवर’ म्हणतात. असते काय की सायकलवर जगभ्रमंती करणाऱ्या लोकांना एक रात्रीसाठी राहायला अत्यंत कमी दरात देणे आणि त्यांची अगदी प्राथमिक सोय करणे, ज्यात त्याची झोपायची जागा आणि दुसऱ्या दिवशीची अंघोळ इतकेच असते. यजमानाने त्यापेक्षा जास्त काही दिले तर तो दिलदार समजला जातो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com