

Pune Mumbai Highway Traffic
esakal
डॉ.अनिल धनेश्वर - आर्थिक, सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक
पुणे- मुंबई द्रुतगती मार्ग तसेच जुना पुणे- मुंबई राष्ट्रीय महामार्ग मंगळवार तीन फेब्रुवारी २०२६ रोजी संध्याकाळी पाच वाजल्यापासून गुरुवार पाच फेब्रुवारी पहाटे पाच वाजेपर्यंत सुमारे ३६ तास बंद होता. प्रोपोलिन गॅसची वाहतूक करणारा टँकर आडोशी टनेल येथे कोलमडला होता. हा गॅस अतिशय ज्वालाग्राही व प्राणघातक असल्याने हा महामार्ग बंद करावा लागला. हा रस्ता बंद असण्याचा आत्तापर्यंतचा हा विक्रमी कालावधी आहे. या घटनेतून बोध घ्यायलाच हवा.