NFT
Esakal
पुणे: NFT (Non-Fungible Tokens) हा मागील काही वर्षांपासून गुंतवणुकीतील काहीसा वादग्रस्त पर्याय ठरला आहे. पण तरीही अनेकांना यामध्ये गुंतवणूक करून पाहण्याची इच्छा आहे. ही गुंतवणूक श्रीमंतांची आहे असे बोलले जाते, मात्र 'ब्लू-चिप' म्हणून ओळखले जाणारे काही NFTs कोट्यवधी रुपयांना विकले गेले, ज्यामुळे या तंत्रज्ञानाने जगभरातील गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले. त्यामुळेच हा बाजार चालतो कसा हे जाणून घेण्याची इच्छा अनेकांना असते. तरीही हे सगळंच प्रकरण प्रचंड जोखीम असणारं आणि अस्थिर आहे. अशा परिस्थितीत, सामान्य गुंतवणूकदारांसाठी NFT मध्ये छोटेखानी गुंतवणूक करणे शक्य आहे का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे.