

AI Upskilling Platform
esakal
‘‘Change is the only constant in life. Ones ability to adapt to those chnages will determine your success in life.’’ हे बेंजामिन फ्रँकलिन यांचे जगप्रसिद्ध वाक्य आजच्या माहिती तंत्रज्ञान आणि ‘एआय’ युगासाठी अतिशय समर्पक आहे. या युगातील नव्या बदलांना सामोरे जाण्याची क्षमता आत्मसात करता आली नाही, तर आपल्यावर ‘आउटडेटेड’ असा शिक्का बसेल, ते टाळण्यासाठी प्रत्येकाला आपल्या कौशल्यांचे ‘अपस्किलिंग’ (upskilling) करण्याशिवाय तरणोपाय नाही. आजच्या तरुणाईने शिकत असतानाच ‘अपस्किलिंग’ची कास धरली, तर त्यांची पावले समृद्धीच्या मार्गावर पडू लागतील. ‘अपस्किलिंग’ची काळाची गरज ओळखून दोन तरुणांनी अभिनव व्यवसायाची पायाभरणी केली आहे. त्याची ही यशोगाथा...
जच्या ‘एआय’च्या युगात नव्या बदलांना सामोरे जाण्याची क्षमता विकसित करण्यासाठी आपली सुप्त कौशल्ये ओळखून ती अधिक अद्ययावत करण्याची म्हणजेच ‘अपस्किलिंग’ करण्याची गरज आहे. ही गरज लक्षात घेऊन पुण्यातील राखी पाल आणि सौरभ मंगळूरकर या दोन तरुण अभियंत्यांनी ‘बीप’ (Beep) या नावाने स्टार्ट-अप सुरू केला आहे. या माध्यमातून त्यांनी विविध ऑनलाइन प्रशिक्षण मॉड्युल तयार करून कौशल्यविकास प्रशिक्षणाचे ‘अपस्किलिंग’ केले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यांनी तयार केलेले ‘बीप हायर’ (Beep Hire) हे मॉड्युल कंपनी आणि नोकरीसाठी पात्र उमेदवार शोधणाऱ्यांसाठी आहे, तर ‘युनी बीप’ (Uni Beep) हे महाविद्यालयीन विद्यार्थांसाठी आणि ‘बीप ॲप’ (Beep App) हे सर्व प्रकारच्या विद्यार्थांसाठी उपयुक्त आहे. आज या ॲपच्या माध्यमातून देशभरातील दहा लाख विद्यार्थी ‘बीप’ (Beep) या कंपनीशी जोडले गेले आहेत.