
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेला भाजपमध्ये विलीन होण्याशिवाय पर्याय नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या चर्चेविषयी बोलताना भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले की, त्यांना भाजपमध्ये विलीन होण्याची का आवश्यकता आहे? तीन वेगवेगळे पक्ष चाललेत ना. प्रत्येकाने स्वत:च्या पक्षाच्या विचारधारेशी कायम राहून पक्ष पुढे नेला पाहिजे. चव्हाण यांची ‘सरकारनामा’च्या प्रतिनिधी दीपा कदम यांनी घेतलेली खास मुलाखत.