Premium|RBI Credit Card Guidelines : आरबीआयचे नवे नियम; क्रेडिट कार्डधारकांना कोणते हक्क मिळणार?

Credit Card Consumer Protection : क्रेडिट आणि डेबिट कार्ड व्यवहार अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि ग्राहकहिताचे करण्यासाठी आरबीआयने नवी मार्गदर्शक तत्त्वे लागू केली असून शुल्क, व्याज, तक्रार निवारण आणि डेटा सुरक्षेवर भर दिला आहे.
RBI Credit Card Guidelines

RBI Credit Card Guidelines

esakal

Updated on

दिलीप घाटे - dilipghate२@gmail.com

क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या वाढत्या वापरासोबत बिलिंगमधील अस्पष्टता, जास्त व्याजदर, लपविलेले शुल्क, अनधिकृत व्यवहार आणि डेटा चोरीसारख्या समस्याही वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) क्रेडिट कार्डविषयक मार्गदर्शक तत्त्वे अधिक मजबूत आणि ग्राहककेंद्रित केली आहेत. त्यामुळे प्लॅस्टिक कार्डचे व्यवहार अधिक सुरक्षित व पारदर्शक होणार आहेत.

भारतामध्ये डिजिटल अर्थव्यवस्थेचा वेगाने विस्तार होत असताना क्रेडिट आणि डेबिट कार्डचा वापर सर्वमान्य झाला आहे. ऑनलाइन खरेदी, ‘यूपीआय’लिंक्ड कार्ड पेमेंट, प्रवास, हॉटेल बुकिंग आणि सबस्क्रिप्शन सेवांसाठी कार्डचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मात्र, या वाढत्या वापरासोबत बिलिंगमधील अस्पष्टता, जास्त व्याजदर, लपविलेले शुल्क, अनधिकृत व्यवहार आणि डेटा चोरीसारख्या समस्याही वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) क्रेडिट कार्डविषयक मार्गदर्शक तत्त्वे अधिक मजबूत आणि ग्राहककेंद्रित केली आहेत. या सुधारणांचा मुख्य उद्देश आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता, सुरक्षितता आणि जबाबदारी वाढविणे हा आहे.

मार्गदर्शक तत्त्वांचे स्वरूप

‘आरबीआय’च्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये क्रेडिट कार्डच्या संपूर्ण जीवनचक्राचा समावेश करण्यात आला आहे. यात कार्ड जारी करणे, वापर, बिलिंग, पेमेंट, तक्रार निवारण, डेटा व्यवस्थापन आणि वसुली पद्धती यांचा समावेश आहे. या नियमांनुसार, बँकांनी ग्राहकांची स्पष्ट संमती घेणे, शुल्क व व्याजाची माहिती पारदर्शकपणे देणे आणि तक्रारींचे वेळेत निराकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमांचा उद्देश ग्राहकांचे हित जपणे आणि वित्तीय संस्थांची जबाबदारी वाढविणे हा आहे. भारतामध्ये क्रेडिट कार्ड व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यानंतर अनेक समस्या प्रकर्षाने समोर आल्या. ग्राहकांना अनेकदा बिलातील शुल्क समजत नव्हते, किमान पेमेंटमुळे कर्ज वाढत होते आणि काही प्रकरणांमध्ये फसवणूक; तसेच डेटा गळती होत होती. याशिवाय तक्रारींचे निराकरण उशिरा होत असल्यामुळे ग्राहकांचा विश्वास कमी होत होता. या सर्व बाबींचा विचार करून ‘आरबीआय’ने अधिक कठोर आणि स्पष्ट नियम लागू केले आहेत.

RBI Credit Card Guidelines
Premium|Credit Score Improvement : क्रेडिट स्कोअरमध्ये सुधारणा कशी करावी?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com