Premium| Types of SIP: योग्य एसआयपी निवडली नाही तर होवू शकतं नुकसान! गुंतवणूकी आगोदर या ५ प्रकारच्या एसआयपींचे स्वरूप आणि फायदे-तोटे जाणून घ्या...

SIP Investment Guide: एसआयपीचे वेगवेगळे प्रकार गुंतवणूकदारांच्या गरजेनुसार निवडणे महत्त्वाचे आहे. योग्य प्रकार निवडल्यास जोखीम कमी होते आणि परतावा जास्त मिळतो. नियमित, फ्लेक्झिबल, टॉप-अप, ट्रिगर आणि पर्पेच्युअल एसआयपी विषयी सविस्तर जाणून घ्या...
SIP Investment Guide

SIP Investment Guide

esakal

Updated on

मागच्या १०–१५ वर्षांत लोक मोठ्या प्रमाणावर ‘एसआयपी’मध्ये गुंतवणूक करत आहेत. पण आजही अनेकांना वाटतं की एसआयपी म्हणजे फक्त दर महिन्याला एका फंडात आपली ठराविक रक्कम जाते आणि ते पैसे वाढत जातात. पण खरी गोष्ट इतकी साधी नाही. एसआयपीचे वेगवेगळे प्रकार आहेत. प्रत्येक एसआयपी दुसऱ्या एसआयपीपेक्षा वेगळी आहे. प्रत्येक एसआयपीचे वेगवेगळे गुणधर्म आहेत, त्यामुळे आपल्या गरजेनुसार आपण एसआयपी निवडायला हवी.

जर तुम्हाला शेअरमार्केटचं काहीच ज्ञान नसेल आणि तुम्ही ट्रिगर एसआयपी निवडली तर तुम्हाला मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागेल. कारण ही एसआयपी ज्यांना शेअरबाजाराचं चांगलं ज्ञान आहे त्यांच्यासाठीच फायद्याची ठरते. जर तुम्ही फ्रिलान्सर किंवा व्यावसायिक असाल, तर नोकरी करणाऱ्या व्यक्तीप्रमाणे दर महिन्याच्या सुरुवातीला हातात पैसे असतीलच असं नाही; मग रेग्युलर एसआयपी तुम्हाला अडचणीत आणू शकते. त्यामुळे तिथे तुम्ही फ्लेक्झिबल एसआयपी निवडायला हवी.

जर तुम्ही लॉंग टर्म संपत्ती साठवायचा विचार करत असाल आणि अगदी तुमच्या एसआयपीचा पुढच्या पिढ्यांना फायदा व्हावा असं तुम्हाला वाटत असेल, तर मग पर्पेच्युअल एसआयपी निवडली नाही तर वारंवार एसआयपी रिन्यू करण्याचा त्रास तुम्हाला सहन करावा लागेल. शिवाय तेवढा चांगला मोबदलाही मिळणार नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल की मला पुढे जावून जास्त पैसे मिळाले तरी तेव्हा महागाई वाढलेली असेल, मग मी एसआयपी का निवडू? तर मग तुम्ही टॉप-अप एसआयपी निवडा, मग तुमची काळजीच मिटेल!

या ज्या वेगवेगळ्या एसआयपी आहेत त्या लोकांना माहित नसतात, त्यामुळे लोकांचं नुकसान होतं. त्यामुळे कोणती एसआयपी कोणत्या गुंतवणूकदारासाठी योग्य असते, हे तुम्हाला माहित असायला हवं. शिवाय या एसआयपींची वैशिष्ट्ये, फायदे–तोटे याचीही तुम्हाला जाण असायला हवी. हे सगळं तुम्हाला सविस्तर वाचायला मिळणार आहे ‘सकाळ+’च्या या विशेष लेखात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com