

District Statistical Abstracts (DSA)
esakal
युगांक गोयल, कृती भार्गव
आपला देश अजूनही एकत्रित राष्ट्रीय आकडेवारीवर अवलंबून राहिला तर प्रगती अन् मागासलेपणाची व्यथा या दोन्हींचे विश्लेषण चुकीचे ठरेल. पण जर भारताने जिल्हा पुन्हा ज्ञानाचे केंद्र म्हणून पुनर्स्थापित केले तर जिल्हा सांख्यिकीय सारांश यंत्रणा (डीएसए) आपल्या मूळ उद्देशासाठी कार्य करू लागेल अन् आपले उद्दिष्ट पूर्ण करेल.
भारतामध्ये माहिती-आकडेवारीचा (डेटा) अभाव नाही. ज्या स्तरावर निर्णय प्रत्यक्ष महत्त्वाचे ठरतात त्या स्तरावर खऱ्या अर्थाने उपयोगी पडणाऱ्या ‘डेटा’चा मात्र अभाव आहे. भारतात ‘डेटा’ संकलन अनेक मार्गांनी होते; मात्र सांख्यिकीय प्रणालीत तीन प्रमुख प्रकार केंद्रस्थानी आहेत.