Health Resolution : आजच्या काळाला अनुसरून आहारविषयक दहा संकल्प

निग्रह निव्वळ भावनिक पातळीवर न करता सुस्पष्ट व तर्कशुद्ध असावेत.
Health Wealth
Health WealthSakal

आरोग्यातील गुंतवणूक ही दीर्घकाळ परताव्याचा लाभ मिळवून देणारी असते. आरोग्य संकल्प नवीन वर्षाच्या आरंभी नक्कीच करावेत. परंतु हे निग्रह निव्वळ भावनिक पातळीवर न करता सुस्पष्ट व तर्कशुद्ध असावेत.

कुठलाही निग्रह करताना त्याची नोंद केली, कागदावर त्याचे प्लॅनिंग केले व जवळच्या काही व्यक्तींना आपला संकल्प शेअर केला तर तो पूर्ण होण्याची शक्यता अधिक असते.

आजच्या काळाला अनुसरून आहारविषयक दहा संकल्प इथे मांडते आहे. आपला आरोग्याचा पाया भक्कम करण्यास हे निग्रह नक्कीच उपयुक्त ठरतील.

डॉ. सीमा सोनीस

आहारविषयक दहा संकल्प

रूटीन इज प्रोटीन – माझ्या जैविक घड्याळाप्रमाणे खाणे सुनिश्चित करेन. जेवणाच्या वेळा कामानुसार न ठरवता माझी प्रकृती, वय व गरजा विचारात घेऊन दिवसभराचे खाण्याचे नियमित असे रूटीन बसवेन.

मिताहार - खाण्याचा वेग कमी करून अन्न चावून खाण्यावर भर देईन. आता पुरे, अशी सूचना मेंदूला पोहोचण्यास यामुळे वेळ मिळेल व त्यामुळे आपसूकच आहाराचे प्रमाण कमी होईल.

तपासणी – (स्त्रियांसाठी) वर्षातून एकदा रक्तातील साखर, हिमोग्लोबिन, व्हिटॅमिन डी३ व व्हिटॅमिन बी१२ची तपासणी करेन. (पुरुषांसाठी) वर्षातून एकदा रक्तातील साखर, व्हिटॅमिन डी३, व्हिटॅमिन बी१२ व होमोसिस्टीनची तपासणी करेन. निव्वळ आजारी पडल्यावरच डॉक्टरांकडे न जाता वर्षातून एकदा या तपासण्या करून पोषणासंधर्भात काय करायला हवे याबाबत सल्लामसलत करेन.

Health Wealth
Healthy Food for Healthy Mind :'हेल्दी माईंड' हवं असेल तर हेल्दी खा !

रक्तदान - वर्षातून किमान एकदा रक्तदान करेन. मी माझ्या शरीराची योग्य ती काळजी घेत आहे, मी पूर्ण निरोगी आहे याची पावती या रक्तदानातून दरवर्षी मिळत राहील. या श्रेष्ठ दानामुळे सामाजिक बांधिलकीचे मानसिक समाधान ही लाभेल.

सेंद्रिय व स्थानिक पदार्थ - आयात केलेले पदार्थ न घेता स्थानिक व सेंद्रिय पदार्थांचा आहारात समावेश करेन.

प्रथिने - प्रत्येक खाण्यात एक प्रथिनयुक्त पदार्थ समाविष्ट करेन. उदाहरणार्थ पोह्याबरोबर चणे फुटाणे, पोळी भाजी बरोबर वरण किंवा अंडी.

Health Wealth
Types Of Meditation : मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर असणाऱ्या मेडिटेशनचे ‘हे’ प्रकार माहित आहेत का?

फलाहार - दिवसातून तीन वेळा फळे अथवा कच्चे पदार्थ खाण्याची सवय लावून घेईन. फळांचा ज्यूस किंवा भाज्यांचा रस न घेता चावून खाण्यावर भर देईन.

चोथा - अन्नातील साखर, तेल, तूप, कर्बोदके कमी करून भाकरी, उसळी, व भाज्या अधिक खाण्यावर भर देईन.

जंकफुडचा हिशोब - पॅकबंद पदार्थ किंवा उपाहारगृहात खाल्ल्यावर झालेल्या खर्चाची नियमित नोंद करून, हा खर्च दर महिन्याला कमी करत जाईन याकडे लक्ष देईन.

माईंड गेम - शरीरावर कुठलाही अशास्त्रीय प्रयोग करणार नाही. अपराधी भावनेतून ‘डाएटिंग’ न करता मन निकोप व आनंदी करण्यावर प्रथम काम करेन.

---------------

Health Wealth
Health Care : रेड वाईन प्यायल्याने फायदा होतो की नुकसान? संशोधनातून झाला खुलासा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com