डॉ. यशवंत थोरात
लष्करात जाण्यातला धोका जवानांना माहीत नसतो असं थोडंच आहे? भरतीच्या पहिल्या दिवसापासून त्यांना तो ठाऊक असतो; पण ते तो धोका स्वीकारतात तो त्यांचा युद्धावर किंवा शौर्यावर विश्वास असतो म्हणून नव्हे, तर शांततेची किंमत आणि मूल्य जगात त्यांच्यापेक्षा अन्य कुणालाच माहीत नसतं म्हणून. युद्धाची भयानकता, त्याची शोकांतिका आणि त्याचे परिणाम जवानांशिवाय अन्य कुणीही नेमकेपणानं जाणू शकत नाही. रणांगणात जवान आपला देह ठेवतात, तो युद्धासाठी नव्हे, तर शांततेसाठी!