Premium|Book cover aesthetics : मुखपृष्ठ म्हणजे फक्त सजावट की लेखनाचा आत्मा? मुराकामीच्या पुस्तकांपासून उलगडलेला 'दृश्य' कलेचा अनोखा प्रवास

Haruki Murakami Cover Art : पुस्तकाचे मुखपृष्ठ हे केवळ बाह्य सजावट नसून ते लेखनाचे दृश्य माध्यमांतर असते. ताकदीचे मुखपृष्ठ वाचकाच्या नेणिवेत कायमचे घर करते आणि पुस्तकाच्या विक्रीच्या गणितातही महत्त्वाची भूमिका बजावते, हाच या लेखाचा गाभा आहे.
Haruki Murakami Cover Art

Haruki Murakami Cover Art

esakal

Updated on

‘Don’t judge a book by its cover’ ही इंग्रजीतली प्रख्यात म्हण आहे. माणसाचं आतलं रूप बघा, बाहेरच्या रूपावर जाऊन फसू नका असा त्याचा आशय आहे. पण खुद्द पुस्तकांच्या बाबतीत मात्र मला वाटतं, मुखपृष्ठ हे आतल्या लेखनाचं दृश्य माध्यमांतर असतं. त्या अर्थानं ते सहोदर असतात. त्यामुळे एकाला बघितलं की दुसऱ्याचा अंदाज येतो. आणि दोन्ही एकत्र समोर धरलं की वाचकाला निखळ दुहेरी आनंद मिळतो!

अगदी परवाची गोष्ट. मी आणि माझा मित्र प्रख्यात जपानी लेखक मुराकामी याच्या पुस्तकांवर गप्पा मारत होतो. त्याच्या नेहमीच्या नॉर्वेजीअन वूड्स वगैरे पुस्तकांवर बोलून झाल्यावर माझ्या मित्राला त्याची अजून एक कादंबरी आठवली. पण त्याला त्याचं नाव आठवेना. तो म्हणाला, ‘‘अरे ते लांबलचक नाव असलेलं पुस्तक बघ... लाल रंगाचं मुखपृष्ठ... त्याच्यात एक मधे पांढरं वर्तुळ आणि त्यात फिरणारे काळे आणि लाल पक्षी...’’ आणि मग तो हे बोलत असताना एकदम आम्हाला दोघांनाही नाव आठवलं आणि एकमेकांना टाळी देत आम्ही एकत्रच म्हणालो, ‘‘साऊथ ऑफ द बॉर्डर, वेस्ट ऑफ द सन!’’ नंतर माझ्या लक्षात आलं, की खरोखर अनेकदा वाचकाला पुस्तकाचं मुखपृष्ठच नेणिवेत लक्षात राहिलेलं असतं. पात्रांची नावं विसरतात, कादंबरीतील प्रसंग विस्मरणात जाऊ शकतात, पण ते मुखपृष्ठ मात्र आत जिवंत राहतं, आणि त्या लेखनाचा सगळा मूड सोबत घेऊन ते जिवंत राहतं.

लहानपणापासून माझी चित्रकला अगदी बेताची होती आणि निबंधात मात्र मला पैकीच्या पैकी गुण असायचे. आता मागं वळून बघताना ध्यानात येतं, की असं असलं तरी लहानपणी बेदम पुस्तकं वाचल्यामुळे मुखपृष्ठांच्या रूपानं नकळत दृश्यकलेचा आनंद घेता आला, नकळत एका दुसऱ्या महान कलेची तोंडओळख झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com