Premium|Ambolgad Konkan Tour : आंबोळगडच्या निसर्गसंपन्न सहलीत अनुभवले साहस आणि आनंद

Ambolgad Konkan Tour : कोकणातील आंबोळगड परिसरातील निसर्गरम्य ठिकाणे, सैतवडे धबधबा, आंब्यांच्या बागा, साहसी उपक्रम आणि कुटुंबासह अनुभवलेला अविस्मरणीय प्रवास यांचे सुंदर वर्णन या लेखात करण्यात आले आहे.
Ambolgad Konkan Tour

Ambolgad Konkan Tour

esakal

Updated on

रमाकांत कुलकर्णी

देवगड नदीवरील सैतवडे धबधबा बघायला आम्ही निघालो. या धबधब्याच्या ठिकाणी पोहोचण्याची वाट दुर्गम होती. उन्हाळ्यातही या धबधब्याचे रमणीय पण रौद्र रूप पाहून डोळ्यांचे पारणे फिटले. धबधब्याच्या ठिकाणी चेतनने आम्हा सर्वांवर पाणी उडवत बालपणीच्या खट्याळ आठवणी जागवल्या.

चेतन केतकर हा धाडसी गिर्यारोहक. त्याने २०१२मध्ये माउंट एव्हरेस्ट सर केले आहे. आता तो त्याच्या संस्थेतर्फे वेगवेगळ्या ट्रेक्स आणि सहलींचे आयोजन करतो. सहसा अनवट (ऑफबीट) ठिकाणी सहली आयोजित करून पर्यटकांना निसर्गाच्या विविध रूपांची अनुभूती देणे, तसेच स्थानिक संस्कृती आणि तेथील वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थांचा आस्वाद मिळवून देणे हा त्याच्या ग्रुपचा मुख्य उद्देश. त्याबरोबरच, या सगळ्याला धाडसी उपक्रमांची जोड देणे, पर्यावरणस्नेही पद्धतीने व स्थानिकांना रोजगार मिळवून देण्याच्या उद्देशाने सहलींचे आयोजन करणे, हे त्याच्या संस्थेचे मुख्य वैशिष्ट्य आहे. चेतन आमच्या चांगल्या परिचयाचा असल्यामुळे त्याच्या ग्रुपबरोबर एखाद्या सहलीला जाण्याचा विचार बरेच दिवस मनात घोळत होता, आणि शेवटी ती संधी मिळालीच!

यंदाच्या उन्हाळ्यात चेतनने कोकणातील राजापूर तालुक्यातील नाटे गावाजवळ आंबोळगड येथे तीन रात्री चार दिवसांची एक सहल आयोजित केली होती. मुळात ही सहल लहान मुलांसाठी होती. परंतु, या सहलीला त्यांचे पालक तसेच आजी व आजोबांनीही सहभागी व्हावे यावर चेतनचा भर होता. मग काय, आम्ही दोघे पती-पत्नी आमच्या दोन्ही नातवंडांसोबत या सहलीला गेलो.  या सहलीत जवळजवळ वीसजण सहभागी झाले होते. आठ ते ७४ वर्षे वयोगटातील उत्साही मंडळींचा यात सहभाग होता. मुख्यतः कोकणातील निसर्गरम्य, नितांत सुंदर आणि शहरी गजबजाटापासून दूर असलेली ठिकाणे सहलीसाठी निवडली होती. या मोसमात आंब्याच्या बागेलगत राहणे, आमरसाचा मनमुराद आनंद घेणे, त्याबरोबरच मुलांसोबत बागेतील आंबे, करवंद, जांभळे खाण्याची मज्जा काही औरच! काही धाडसी खेळ, बीचवर कॅम्पिंग, धबधबे तसेच मुलांना आंब्याच्या बागेचे व्यवस्थापन कसे करतात, हे शिकविणे या ॲक्टिव्हिटीजचाही सहलीत समावेश होता. यामुळे फिरणे व मनोरंजनाबरोबरच शिकणेही होणार होते. आरामदायी बस प्रवास, कोकणात तीन रात्री राहण्याची सोय यामुळे ही सहल छान झाली.   

Ambolgad Konkan Tour
Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com