Premium|American Food Culture : अमेरिकेतील खाद्यसंस्कृतीचा रंगीबेरंगी प्रवास

Food Experience In America : अमेरिकेच्या खाद्यसंस्कृतीतून तेथील जीवनशैली, शिस्त, स्वच्छता आणि ग्राहकसेवेचे दर्शन घडते. पॅनकेक्सपासून सुपरमार्केटपर्यंतचा अनुभव अन्न आणि संस्कृती यांचे अनोखे नाते उलगडतो.
Food Experience In America

Food Experience In America

esakal

Updated on

प्रिया काळे

अमेरिकी लोकांच्या दैनंदिन जीवनात बर्गर, हॉट डॉग, फ्रेंच फ्राइज, मॅक्रोनी ॲण्ड चीज, पॅनकेक्स, डोनट्स आणि बार्बेक्यू पदार्थांना विशेष स्थान आहे. सकाळच्या नाश्त्यात मेपल सिरपबरोबर दिले जाणारे मऊसूत पॅनकेक्स, त्यावर वितळणारे बटर आणि गरम कॉफी हा अमेरिकी जीवनशैलीचा अविभाज्य भाग वाटतो.

‘‘जग पाहायचं असेल तर त्या देशाचं अन्न चाखा,’’ अशी प्रसिद्ध म्हण आहे. अन्न ही गोष्ट त्या समाजाची संस्कृती, जीवनशैली, शिस्त, हवामान आणि माणुसकी यांचा आरसा असते. अमेरिकेत पंधरा दिवसांच्या वास्तव्यासाठी जाण्याची संधी मिळाली. त्या देशातील खाद्यसंस्कृती अनुभवताना मला वारंवार पु. ल. देशपांडे यांच्या प्रवासवर्णनांची आठवण येत राहिली. पुलंनी जसे चवीतून माणसांचे स्वभाव टिपले आहेत, तसेच अमेरिकेच्या खाद्यसंस्कृतीतून तेथील लोकांचे व्यक्तिमत्त्व दिसत गेले. शिस्तप्रिय, स्वच्छताप्रिय, वेळेचे काटेकोर पालन करणारे आणि तरीही खाण्याचा मनमुराद आनंद घेणारे अमेरिकन्स!

विमानातील खाद्ययात्रा

प्रवासाची सुरुवात झाली तीच विमानातील चमचमीत खाद्यपदार्थांनी. भारतीय आणि अमेरिकी विमान कंपन्यांच्या ट्रेमधून येणारा पास्ताचा वास, ताज्या फळांचे रंगीत ताट, गरमागरम मेदूवडा व सांबार, रॅप्स, मफिन्स, कुकीज आणि कॉफीचा मंद दरवळ... जणू आकाशात उडतानाच जागतिक खाद्ययात्रा सुरू झाली होती. विमानातील जेवणाबद्दल अनेकदा तक्रारी ऐकायला मिळतात. पण या प्रवासात मात्र प्रत्येक ट्रे छोटेखानी फूड फेस्टिव्हलच वाटत होता. अमेरिकेतील विमानतळांवर मिळणारे स्नॅक बॉक्स आणि मील बॉक्स हे प्रवाशांसाठी अतिशय उपयुक्त पर्याय आहेत. पारदर्शक आणि नीटनेटके पॅकिंग असलेल्या या बॉक्समध्ये सँडविचेस, चीज क्युब्स, क्रॅकर्स, ताजी फळे, ड्रायफ्रुट्स, प्रेट्झेल्स, कुकीज, चॉकलेट्स, योगर्ट, सॅलड, प्रोटीन बार्स, चिकन, टर्की किंवा एग रोल्ससारखे अनेक पदार्थ असतात. विशेष म्हणजे प्रत्येक बॉक्सवर त्यातील कॅलरीज, पोषणमूल्ये, घटक आणि एक्सपायरी डेट स्पष्टपणे दिलेली असते. किंमत थोडी जास्त वाटली, तरी त्यातील ताजेपणा, स्वच्छता आणि संतुलित आहार पाहता ती योग्य वाटते. काही वेळा तर हे स्नॅक बॉक्स पाहून आपल्याकडील प्रवासात आईने दिलेल्या डब्याची आठवण येते.

Food Experience In America
Premium|London travel bucket list : लंडन बकेट लिस्ट पूर्ण; स्वामीनारायण मंदिरापासून शेक्सपिअरच्या गावापर्यंतचा अविस्मरणीय प्रवास
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com