
सुजाता देशमुख
एके दिवशी सकाळी फेसबुकावर उडती सैर करत असताना सापडली अमृता खंडेराव नावाची ‘गुलबकावली’. अमृताची ती गोष्ट, की स्वानुभवाधारीत कथा म्हणायची, शब्दशः खेचत घेऊन गेली आणि तिच्या पोस्ट्स वाचण्याची तिने चटक लावली. विदर्भातल्या एका छोट्या खेड्यात राहणारी ही उच्चशिक्षित, सासुरवाशीण. नवरा प्राध्यापक. स्वतःही शिक्षिका. तल्लख बुद्धी, चौकस नजर, माणसांना वाचण्याची कला आणि भरपूर चौफेर वाचनाने आलेल्या शहाणपणासहित पोटात वंचितांबद्दल अपार माया, सहानुभूती. तशात या तरुणीला लेखनशैलीचा वरदहस्त आणि त्यावर कडी म्हणजे निर्मळ विनोदबुद्धी. मान्यताप्राप्त मराठी, इंग्रजी आणि वैदर्भीय भाषेचा अनोखा संगम असलेल्या तिच्या सगळ्या गोष्टी... वा!