Fansipan Mountain
Esakal
सापातील सर्वात प्रसिद्ध अशा फन्सिपन माउंटनपासून आमच्या भ्रमंतीची सुरुवात झाली. हे इंडो-चायनामधील सर्वात उंच ठिकाण आहे. इथे जाण्यासाठी केबल कार आणि त्यानंतर एक छोटी फनिक्युलर ट्रेन वापरावी लागते. आम्ही तिथे गेलो त्यादिवशी खूप पाऊस आणि धुके असल्यामुळे वरून फार काही दिसले नाही.
वेळी दक्षिण-पूर्व आशियाचा आमचा दौरा चांगलाच लांबला होता. जवळपास वीस दिवस आम्ही बाहेर होतो आणि त्याला कारणही तसेच होते. आधी ग्रुप टूर झाली आणि नंतर मित्रांबरोबरची ट्रिप झाली. मी, देवा घाणेकर आणि डॅनी पंडित अशा आम्ही तिघांनी व्हिएतनाममधील सापा आणि फू कॉक येथे जाण्याचा बेत आखला. या प्रवासाने आम्हाला खूप नवीन अनुभव दिले.