गरमागरम बीन कटलेट नि पालक ऑम्लेट!

पौष्टिक आणि चवदार
beans  cutlet's
beans cutlet's Esakal

अमृता आर्ते

बीन कटलेट

साहित्य

 एक कप मिक्स्ड बीन (काबुली चना, राजमा, चवळी इत्यादी), अर्धा कप मिक्स्ड व्हेजिटेबल (गाजर, बीट, मक्याचे दाणे इ.), १ उकडलेला बटाटा, पाव कप ब्रेड क्रम्ब, १ बारीक चिरलेला कांदा, २ हिरव्या मिरच्या, २ चमचे आले-लसूण ठेचा, १ चमचा गरम मसाला पावडर, अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर, थोडी कोथिंबीर व पुदीना बारीक चिरून, मीठ आणि मिरपूड चवीप्रमाणे, ४-५ टेबलस्पून तेल.

कृती

बीन एकत्र करून सहा-सात तास भिजवून नंतर कुकरमध्ये तीन-चार शिट्या करून शिजवून घ्यावेत. भाज्या किसून, बारीक चिरून उकडून घ्याव्यात. उकडलेले मिक्स्ड बीन, भाज्या एका बाऊलमध्ये घ्याव्यात. त्यात उकडलेला बटाटा कुस्करून घालावा.

ब्रेड क्रम्ब, कांदा, आले-लसूण ठेचा, बारीक चिरलेली कोथिंबीर व पुदीना, गरम मसाला, लाल मिरची पावडर, मीठ आणि मिरपूड घालून नीट एकजीव करून घ्यावे. मिश्रणाचे  तुमच्या आवडीच्या आकाराचे कटलेट करून शॅलो फ्राय करावेत. गरमागरम चटणी किंवा सॉसबरोबर सर्व्ह करावेत.

 omelette
omeletteEsakal

पालक ऑम्लेट

साहित्य

एक कप पालकाची पाने, पाव कप बारीक चिरलेला कांदा, ४-५ लसूण पाकळ्या बारीक चिरून, तेल, पाव कप मोड आलेले हिरवे मूग, पाव कप बारीक चिरलेली हिरवी सिमला मिरची, मीठ, मिरपूड चवीप्रमाणे, ४ अंडी.

कृती

पालकाची पाने धुऊन, बारीक चिरून घ्यावीत. मोड आलेले मूग क्रशरमधून फिरवून घ्यावेत. एका बाऊलमध्ये पालकाची पाने, क्रशरमधले मूग, सिमला मिरची, लसूण, कांदा, मीठ, मिरपूड घालावे.

अंडी फोडून त्यात घालावीत व एकत्र फेटून घ्यावे. गॅसवर  फ्राय पॅनमध्ये तूप किंवा बटर घालून ऑम्लेट घालावीत. शॅलो फ्राय करावीत. आवडीप्रमाणे वरून पेरीपेरी मसाला किंवा हर्बसुद्धा घालू शकता.

--------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com