विक्रम अवसरीकर
आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीमध्ये टॅक्स वाचवण्यासाठी अनेकांची धांदल उडते. आधी कुठली गुंतवणूक न केलेले विविध पर्यायांची चाचपणी करायला सुरुवात करतात. अनेक लोक दरवर्षी न चुकता जानेवारीतच जागे होतात आणि धावपळ करतात असेच दिसून येते.
कलम ८०सीमधील गुंतवणुकीमुळे टॅक्स वाचतोच, पण एक प्रकारे संपत्ती निर्माण करण्याचेही काम होते. भारत सरकारच्या माहितीप्रमाणे ह्यावर्षी नवीन टॅक्स पद्धतीप्रमाणे साधारण ७२ टक्के विवरण पत्रे भरली गेली. अशा परिस्थितीत जे लोक बाकी कोणताही विचार न करता फक्त टॅक्स वाचवण्यासाठीच गुंतवणूक करत होते त्यांची पंचाईत झाली. काही गुंतवणुकींत जरी आता नवीन पद्धतीप्रमाणे प्राप्तिकर सवलतींचा फायदा मिळत नसला, तरीदेखील ती गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे.