Premium|Bike Customization for Safety : बाईक कस्टमायझेशन केवळ दिखावा नाही; सुरक्षितता आणि आनंदासाठी योग्य अ‍ॅक्सेसरीजची अशी करा निवड

Riding Experience in Ladakh Khardung La : १३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आणि सव्वा लाख किलोमीटरच्या प्रवासातून सिद्ध झालेली बाईक कस्टमायझेशनची गरज; केवळ सौंदर्यासाठी नव्हे, तर सुरक्षितता आणि सोयीस्कर रायडिंगसाठी अ‍ॅक्सेसरीजची निवड कशी असावी, याचा उलगडा करणारा हा विशेष लेख.
Bike Customization for Safety

Bike Customization for Safety

esakal

Updated on

श्रेयस भंडारी

बाइक कस्टमायझेशन म्हणजे फक्त ‘लुक्स’ नाही. तो एक अनुभव आहे, सुरक्षिततेची गुंतवणूक आहे आणि रायडिंगचा आनंद वाढवणारा मार्ग आहे. माझ्यासाठी, प्रत्येक राइड एक नवी गोष्ट शिकवते. योग्य अ‍ॅक्सेसरीजमुळे त्या प्रवासाचा आनंद अनेक पटींनी वाढतो. बाइक चालवताना हायवेवर किंवा ऑफ-रोडवर सुरक्षितपणे रायडिंगचा आनंद घ्या. कारण रायडिंग इज नॉट अबाउट रिचिंग द डेस्टिनेशन, इट्स अबाउट द जर्नी!

लडाखला खारदुंग ला पासपाशी होतो, संध्याकाळ झाली होती. हळूहळू धुकं वाढत होतं आणि रस्ता ओला होता. एका तीव्र वळणावर अचानक समोरून ट्रक आला... त्या क्षणी माझ्या बाइकवरच्या कस्टमाइज्ड लाइट्समुळे मला रस्ता स्पष्ट दिसला, चांगल्या ब्रेकिंगमुळे बाइक वेळेत कंट्रोलमध्ये आली आणि मोठा अनर्थ टळला. अवघ्या काही सेकंदांचा निर्णय होता तो, पण तो घेताना आत्मविश्‍वासाबरोबरच बाइकला योग्य अ‍ॅक्सेसरीज असणं खूप महत्त्वाचं ठरलं. तेरा वर्षांहून अधिक आणि १,२०,००० किलोमीटरपेक्षाही जास्त बाइक रायडिंगचा माझा अनुभव. हा अनुभव घेताना मला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली, ती म्हणजे बाइक कस्टमायझेशन. बाइक कस्टमायझेशन दिखाव्यासाठी नसतं, तर ते तुमचं रायडिंग अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि आनंददायी करण्यासाठी असतं.

मी २०१३पासून बाइक चालवत आहे. आजपर्यंत चार प्रकारच्या वेगवेगळ्या स्पोर्ट्‌स बाइक्स वापरल्या. २०२०मध्ये घेतलेली केटीएम ॲडव्हेंचर ३९० ही बाइक माझ्या रायडिंग स्टाइलनुसार मी पूर्णपणे कस्टमाइज करून घेतलेली आहे. शहरातलं रायडिंग, लाँग टूरिंग, शॉर्ट वीकएंड राइड्स आणि ऑफ-रोडिंग या सगळ्यादृष्टीनंच बाइक रेडी केलेली आहे. आज मी अनेक रायडर्सना योग्य अ‍ॅक्सेसरीज निवडायला मदत करतो, पण त्याआधी एक गोष्ट नेहमी सांगतो - ‘सुरक्षितता (सेफ्टी गिअर्स) आधी, अ‍ॅक्सेसरीज नंतर!’

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com