राधिका परांजपे-खाडिलकर
“मायनस ५० डिग्री टेंपरेचर था... ९० डिग्री अँगल मे हम रोप लगा कर धीरे धीरे चढ रहे थे... हमसे पहले दो बार दो टीमों का ऑपरेशन पूरा नही हो पाया था... सप्लाइज सब खत्म होने लगे थे... पाकिस्तान तो चाहता था की वहाँ कोई आ ना पाए... लेकिन क्या है, हिंदुस्तानी फौज तो चाँद को भी छू सकती है, वो तो फिर भी एक छोटी सी पहाडी थी... वहा भारत का झंडा लेहराना ही था ।” परमवीर चक्र विजेते कॅप्टन बाणा सिंग त्यांच्या ठेवणीतल्या धारदार आवाजात सांगत होते. त्यांच्या प्रत्येक वाक्यागणिक अंगावर काटा येत होता.
सियाचिनच्या शौर्यगाथा या कार्यक्रमाच्या निमित्तानं परमवीर चक्र विजेते मानद कॅप्टन बाणा सिंग पुण्यात आले असताना त्यांना भेटण्याचा योग आला होता. जवळपास अर्धा तास त्यांच्याशी झालेल्या गप्पांमधून ऑपरेशन राजीवविषयी बरंच काही जाणून घेता आलं. त्याआधी ऑपरेशन राजीवविषयी ऐकलं-वाचलं होतंच, पण साक्षात कॅप्टन बाणा सिंग यांच्याकडून ती शौर्यगाथा ऐकण्याचा अनुभव रोमांचक होता...