महेश सूर्यवंशी
कोणत्याही मंगलकार्यामध्ये किंवा पूजाअर्चा करताना सर्वात आधी श्रीगणेशाचे पूजन केले जाते. संकटकाळीही सर्वात आधी श्रीगणेशाची आराधना केली जाते.
मी अभ्यासक, विद्वान नाही, पण मी गणपती बाप्पाचा उपासक नक्कीच आहे. मी सार्वजनिक गणेशोत्सवातील एक कार्यकर्ता आहे. गणेशोत्सवात काम करूनच गणपती बाप्पाबद्दल अधिक जाणून घेण्याची जिज्ञासा विकसित झाली. त्यानंतर मुद्गल पुराणासह गणपतीबद्दल जे जे साहित्य मिळत गेले ते वाचत गेलो. त्यातून मला जे समजले, ते आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे.