Premium|City Life vs Village Life : शहर की गाव, आनंदी आयुष्यासाठी नेमका योग्य पर्याय कोणता?

Why People Are Returning to Villages : शहर आणि गाव यांची तुलना केवळ सोयी-सुविधांपुरती मर्यादित नसून, संधी, जीवनशैली, मानसिक समाधान आणि वैयक्तिक ध्येय यांवरही अवलंबून असते, असा विचार या लेखातून मांडला आहे.
Why People Are Returning to Villages

Why People Are Returning to Villages

esakal

Updated on

अक्षय प्रभाकर वाटवे

प्रश्न असा आहे, की आपण जिथं आहोत, तिथं आपण जगतोय, की फक्त ‘मॅनेज’ करतोय? कारण काही लोक गावात राहूनही आतून थकलेले असतात आणि काही लोक शहरात राहूनही ‘जिवंत’ असतात. ‘शहर वाईट आणि गाव चांगलं’ किंवा ‘गाव मागास आणि शहर प्रगत’ इतकं सोपं समीकरण नसतं. कधीकधी शहर आपल्याला घडवत असतं आणि कधीकधी तेच शहर आपल्याला खातही असतं. फरक एवढाच, हे दोन्ही नेमकं कोणत्या क्षणी सुरू होतं, हे आपल्याला लगेच लक्षात येत नाही.

गेल्या काही महिन्यांत मला एक गोष्ट फार प्रकर्षानं जाणवू लागली. सोशल मीडियावर शहर सोडून गावी जाण्याच्या पोस्ट लिहिणारे, व्हिडिओ करणारे, रील्स करणारे लोक अचानक खूप वाढलेत. ‘इनफ ऑफ सिटी लाइफ’, ‘स्लो लिव्हिंग’, ‘बॅक टू रूट्स’, ‘हीलिंग इन द व्हिलेज’ असे शब्द आता इतके जास्त ऐकू येतात, की कधीकधी वाटतं, गाव म्हणजे एखादं मेडिटेशन रीट्रीट आहे की काय! मीही या विचारांतून गेलो आहे. अजूनही जातो आहे. पण एक गोष्ट मात्र मला सतत टोचत राहिली ती म्हणजे, गावाकडे परतणं ही खरंच सगळ्यांसाठी प्रॅक्टिकल गोष्ट असते का...? कारण आपण अनेकदा गावाचं वर्णन इतक्या रोमँटिक पद्धतीनं करतो, की वास्तव बाजूलाच राहतं.

हे खरंच आहे, की शहरात ट्रॅफिक आहे, गावात निवांतपण आहे. शहरात स्ट्रेस आहे, गावात शांतता आहे. काँक्रीटचं जंगल विरुद्ध हिरवी गर्द वनराई वगैरे सगळं ऐकायला खूप सुंदर वाटतं, पण मग मला प्रश्न पडतो - गावात राहणाऱ्यांपैकी अनेकांना आजही शहरात का यायचंय? देवगड, खेड, चिपळूण, सावंतवाडी, रोहा, पेण, अंबरनाथ, जळगाव, लातूर... कुठल्याही छोट्या शहरात किंवा गावात जा; तिथला एखादा २२-२३ वर्षांचा मुलगा भेटला, तर त्याला पुण्या-मुंबईत यायचं असतं. का...? कारण शहर फक्त थकवत नाही, तर शहर संधीही देतं. एक्स्पोजर देतं, नेटवर्क देतं, करिअर देतं; कधीकधी ओळखही देतं.

Why People Are Returning to Villages
Premium|Anil Avchat: ‘आता चढ नाही…’ अवचटांची जीवनकविता आणि वास्तव
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com