Premium|Community Biking Culture : ग्रुप राइडमध्ये 'रेस' नाही तर 'सोबत' महत्त्वाची; अनुभवी बायकर्सकडून जाणून घ्या प्रवासाची शिस्त

Group Motorcycle Riding Etiquette : बायकिंग म्हणजे केवळ वेगाचा थरार नसून निसर्गाचा आनंद घेत केलेला एक सुरक्षित प्रवास आहे. ग्रुप राइडिंगमध्ये एकमेकांची काळजी घेत आणि शिस्त पाळत 'स्पिरीट ऑफ बायकिंग' कसे जपावे, यावर वर्षा जोशी-आठवले यांनी प्रकाश टाकला आहे.
Community Biking Culture

Community Biking Culture

esakal

Updated on

वर्षा जोशी-आठवले

बाइक राइड म्हणजे नुसतंच बाइक घ्यायची आणि अतोनात वेगात ती दामटायची, हवी तशी चालवायची, त्यावर स्टंट करायचे असं नसतं. तर क्रूझर बाइक चालवणं हा आनंद असतो तो घ्यायलाच हवा. त्यातून निसर्ग बघत, त्याचा आनंद घेत, वेगाचीही मजा अनुभवणं आहे. रस्ता कसाही असो, स्वतःला आणि गाडीला सुरक्षित ठेवून प्रवास करणं महत्त्वाचं असतं. दुसरं आणि महत्त्वाचं म्हणजे, एखाद्या ग्रुपसोबत प्रवास करताना रेस लावल्यासारखी बाइक चालवायची नसते, तर एकमेकांना मदत करत, काळजी घेत जायचं असतं.

दोन वर्षांपूर्वी मी अजितसह त्यांच्या ग्रुपबरोबर स्पितीला बाइक राइडला गेले. अर्थात मी मागच्या सीटवरची प्रवासी. तेव्हाच या बाइक रायडिंगची क्रेझ असणाऱ्या असंख्य लोकांबद्दल कळलं. रस्त्यातही अनेक ठिकाणी असे लोक भेटत गेले. या प्रवासात मी मागच्या सीटवर बसले, तरी बायकिंगच्या क्रेझचा किंचितसा अनुभव घेता आला आणि मग या बायकर्सविषयी माझीही उत्सुकता वाढत गेली. आपल्या शहरातही बरेचदा बायकिंग गिअर्स घातलेले, गाडीला मागे मोठे व्हॅनिटी बॉक्सेस लावलेले अनेकजण आजूबाजूने जाताना दिसतात, तेव्हाही आज यांची कोणती राइड असेल अशी उत्सुकता वाटायला लागते. तर अशाच काहींशी त्यांच्या बाइक राइड्सविषयी चर्चा करायला मिळाली.

Community Biking Culture
Premium|Konkan Coastal Journey : कुतूहलानं रंगलेली कोकणातील सफर
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com