Skin care : 'मेकअप' मुळे तुमचीही स्किन खराब झालीये का? घ्या अशी काळजी..

मेकअप आर्टिस्ट कोणत्या ब्रँडचे प्रॉडक्ट वापरत आहेत, ह्याची त्यांच्याकडे चौकशी करावी...
Skin care
Skin careEsakal

त्वचेची वेळीच योग्य काळजी न घेतल्याने बऱ्याचदा नको त्या समस्या उद्‍भवू शकतात. त्यामुळे कुठलेही प्रॉडक्ट वापरताना काळजीपूर्वक, माहिती करून घेऊन वापरायला हवे.

स्वप्ना साने

माझे लग्न होऊन जेमतेम एक महिना होतोय. पण लग्नानंतर माझी स्किन खूप खराब आणि रफ जाणवतेय. त्याआधी त्वचा कधी रफ नव्हती. लग्नाच्या वेळेस मेकअप केला होता, तेव्हापासून थोडे पुरळ यायला लागले.

मला वाटले स्ट्रेसमुळे आले असावे, म्हणून दुर्लक्ष केले. पण इतके दिवस झाले तरी अजूनही थोडे पुरळ येतेय, अन् त्वचा ड्राय, रफ झाली आहे.

मला काही औषध घ्यावे लागेल का? की काही घरगुती उपाय करून ठीक होऊ शकेल? मी लग्न करून दुसऱ्या शहरात आले आहे, म्हणून मला इथले जास्त काही माहीत नाही, त्यामुळे घरगुती काही उपाय असल्यास मार्गदर्शन करावे.

तुमच्या सांगण्यावरून असे वाटते आहे, की एकतर तुम्हाला लग्नाच्या वेळेस केलेला मेकअप सूट झाला नसावा, किंवा रात्री तो नीट काढला गेला नसावा. अनेकवेळा मेकअप चांगला क्लीन केला गेला नाही, तर त्याचे ट्रेस किंवा काही प्रमाणात त्याचे कण त्वचेवर राहून जातात.

ते कण रोमछिद्रांमध्ये अडकून त्वचेचे नुकसान करू शकतात. मेकअप चांगल्या तऱ्हेने मेकअप रिमुव्हरने  पुसून काढायला हवा. मेकअप प्रॉडक्टची क्वालिटीही बघायला हवी. मेकअप आर्टिस्ट कोणत्या ब्रँडचे प्रॉडक्ट वापरत आहेत, ह्याची त्यांच्याकडे चौकशी करावी. लग्नाचा मेकअप हेवी असतो, त्वचेवर वेगवेगळे लेअर लावले जातात.

कुठल्या तरी प्रॉडक्टमधील एखाद्या घटकाची ॲलर्जी आली असेल, तर त्यामुळेसुद्धा तुमच्या चेहऱ्यावर पुरळ येण्याची शक्यता आहे. दुसरे म्हणजे, तुम्ही राहत असलेल्या ठिकाणी जर हार्ड वॉटर असेल आणि तुमच्यासाठी तो एक बदल असेल, तर ते तुमच्या त्वचेला सूट झाले नसेल. पाण्यात बदल झाल्यावर पोट बिघडते, त्याचप्रमाणे केस गळणे, किंवा त्वचा रफ जाणवणे, असेही प्रकार होऊ शकतात.

मेकअपमुळे पुरळ येत असेल, तर तुम्ही अँटिॲलर्जिक औषध घेऊन बघा, तेही तुमच्या माहितीतल्या डॉक्टरला विचारून. कारण ह्याचे नेमके कारण प्रत्यक्षात त्वचा बघितल्याशिवाय सांगता येणार नाही.

तज्ज्ञांचा सल्ला घेईपर्यंत तुम्ही घरगुती उपाय करू शकता. १ चमचा मुलतानी माती, १ चमचा चंदन पावडर, १ चमचा मध आणि रोझ वॉटर मिक्स करून पॅक तयार करावा. ह्यात चिमूटभर हळद घालावी. चांगले मिक्स करून हा पॅक रोज पाच मिनिटे लावून ठेवावा आणि गार पाण्याने चेहरा धुऊन घ्यावा. त्यानंतर ॲलोव्हेरा जेल लावावे. फरक जाणवेल. तरीही एकदा तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.

सतत चष्मा वापरल्यामुळे नाकावर त्याचे डाग पडले आहेत. अलीकडेच लेझर ऑपरेशन केले म्हणून आता चष्मा घालत नाही. त्यामुळे ते डाग उठून दिसतायत. डाग कमी किंवा नाहीसे करण्यासाठी काही क्रीम किंवा पॅक लावता येईल का?

खूप जास्त जुने डाग किंवा पिगमेंटेशन लवकर जात नाही. तुम्ही स्किन लायटनिंग क्रीम वापरू शकता, पण एखाद्या डॉक्टरचा सल्ला घेऊनच कोणते क्रीम वापरावे हे विचारावे. मेडिकेटेड क्रीममध्ये हीलिंग प्रॉपर्टी असतात, त्यामुळे अशी क्रीम त्वचेला लाइट करण्याबरोबरच हायड्रेटही करतात.

ह्याशिवाय तुम्ही सॅलिसिलिक ॲसिडयुक्त फेसवॉश वापरू शकता. शिवाय नाकाभोवती कॉफी, कोकोनट ऑईल आणि थोडी पिठीसाखर मिक्स करून तो पॅक लावावा. १० मिनिटांनी हलके हलके पॉलिश करत धुऊन घ्यावा. डाग कमी व्हायला वेळ लागेल, पण नक्कीच कमी होतील.

Skin care
Skin Care : गुलाब पाण्यात चुकूनही मिक्स करू नका ‘या’ गोष्टी, अन्यथा होऊ शकते त्वचेचे नुकसान!

माझे वय २६ वर्षे आहे. माझी त्वचा खूप ड्राय आहे. शीट मास्कची ॲड बघितली, म्हणून वाटले की वापरून बघावा. पण ह्याबद्दल फारशी माहिती नाही. हल्ली खूप वेगवेगळ्या ब्रँडचे वेगवेगळे प्रॉडक्ट पाहण्यात येतात. ते प्रॉडक्ट बघून असे वाटते, की आपल्याला हे सूट होणार का? किंवा ॲलर्जी झाली तर? मी कोल्ड क्रीम वापरते, पण तरीही चेहरा डल आणि ड्राय दिसतो, कृपया मार्गदर्शन करावे.

ड्राय आणि डल त्वचेसाठी शीट मास्क खूप इफेक्टिव्ह असतात. पण त्यात हॅलुरोनिक ॲसिडसारखे त्वचेला हायड्रेट करणारे घटक असायला हवेत. शीट मास्क निवडताना त्यातील घटक नीट वाचून घ्यावे. त्यात जास्तीत जास्त नैसर्गिक घटक असायला हवेत, जे त्वचेला पोषण देऊन त्वचा हिलसुद्धा करतील.

शीट मास्कचा उपयोग तुम्ही आठवड्यातून दोन वेळा करू शकता, पण त्याबरोबरच तुम्हाला होम केअरचीसुद्धा गरज आहे. त्वचेला फक्त कोल्ड क्रीम लावून चालणार नाही. हायड्रेटिंग फेस सीरम वापरायला हवे. तसेच नियमितपणे त्वचा एक्सफोलिएट करणे आवश्यक आहे. त्यासाठी कोरड्या त्वचेला चालेल असा एएचएयुक्त फेस स्क्रब वापरावा.

किंवा घरगुती आयुर्वेदिक उटणे वापरले तर अधिक उत्तम. तसेच तुमच्या ब्यूटी थेरपिस्टचा सल्ला घेऊन दर महिन्याला हायड्रेटिंग आणि नरीशिंग फेशियल करून घ्यावे. तुम्हाला नक्की फरक जाणवेल आणि तुमची त्वचा लगेच ग्लो करेल.

निवेदन

थंडीत पायांना खूप भेगा पडतात, डोळ्यांखाली डार्क सर्कल्स तयार झाली आहेत, ओठ खूप फुटतात, कोंडा काही केल्या जात नाही... तुम्हालाही जाणवतात का अशा समस्या? त्यावर उपाय सापडत नाहीये? मग तुमचे प्रश्न आम्हाला पाठवा, आम्ही या सदरातून त्याची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू.

saptahiksakal@esakal.com या ई-मेलवर तुमचे प्रश्न पाठवा. ई-मेलच्या विषयात ‘ब्यूटी केअर’ असा उल्लेख करायला आणि सोबत तुमचा फोन नंबर लिहायला विसरू नका.

-----------------

Skin care
Make Up Tips | आयब्रो मेकअप कसा करावा, फॉलो करा टिप्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com