Valentine Chocolate Recipe: स्वतःच्या हाताने केलेले 'व्हॅलेंटाइन चॉकलेट्स' द्या तुमच्या प्रिय व्यक्तीला..!

Valentine Day Special: व्हॅलेंटाइनसाठी खास स्वादिष्ट आणि खमंग रोस्टेड आ‍लमंड चॉकलेट बनवा..
Homemade Valentine Chocolate
Homemade Valentine ChocolateEsakal
Updated on

फूडपॉइंट : वर्षा कदम

रोस्टेड आ‍लमंड चॉकलेट

साहित्य

एक कप डार्क कंपाऊंड, १ कप मिल्क कंपाऊंड, अर्धा कप बदाम.

कृती

सर्वप्रथम १ कप डार्क कंपाऊंड आणि १ कप मिल्क कंपाऊंड समान मापात कापून घ्यावेत. अर्धा कप बदाम कोरडेच भाजून घ्यावेत. नंतर दोन्ही कंपाऊंडचे तुकडे एका काचेच्या बाऊलमध्ये घ्यावेत. एक पातेले घेऊन त्यात उकळते पाणी घ्यावे. त्या पाण्याच्या भांड्यावर कंपाऊंड्स ठेवलेला बाऊल ठेवावा.

कंपाऊंड्सच्या बाऊलमध्ये किंचितही पाणी जाणार नाही याची काळजी घ्यावी. खालच्या पाण्याला बाऊल टेकू देऊ नये. पाणी हा चॉकलेटचा शत्रू असतो. त्यामुळे पाण्याचा अंश किंवा मॉइस्चर राहणार नाही याची काळजी घ्यावी. हे मिश्रण न झाकता २० मिनिटे तसेच ठेवून द्यावे. मधेमधे चमच्याने हलवावे. म्हणजे चॉकलेट कंपाऊंड्स वितळतात.

दुसऱ्या पद्धतीनेही चॉकलेट वितळवता येते. घरी मायक्रोवेव्ह असेल तर २० सेकंदासाठी कंपाऊंड्सचा बाऊल मायक्रोवेव्हमध्ये ठेवावा. मग बाहेर काढून चमच्याने हलवून पुन्हा २० सेकंद मायक्रोवेव्हमध्ये ठेवावा.

पुन्हा बाहेर काढून हलवून पुन्हा २० सेकंद मायक्रोवेव्हमध्ये ठेवावा. अशा प्रकारे एका मिनिटात चॉकलेट वितळते. बाऊलमधील चॉकलेट वितळल्यावर चमच्याने व्यवस्थित हलवावे, पण फेटू नये. त्यात एअर बबल किंवा बुडबुडे येता कामा नयेत. बाऊलच्या खाली एक जाडसर कापड ठेवून वितळलेले चॉकलेट बाजूला ठेवावे.

भाजलेल्या बदामांची मिक्सरमध्ये जाडसर पूड करून घ्यावी. वितळलेल्या चॉकलेटमध्ये ही पूड थोडी थोडी करून मिसळावी. त्यानंतर हे मिश्रण पायपिंग बॅगमध्ये भरून मोल्डमध्ये घालावे. खूप गरम असलेले मिश्रण मोल्डमध्ये घालू नये, नाहीतर चॉकलेट्स चिवट होतात.

मोल्डमध्ये मिश्रण घातल्यावर दोन-तीन वेळा मोल्ड खाली टॅप करावा, म्हणजे त्यातील बबल निघून जातात. नंतर हा मोल्ड दहा मिनिटे फ्रिझरमध्ये ठेवावा. दहा मिनिटांनी काढून मोल्ड मागच्या बाजूने फ्रॉस्ट झाला आहे का ते पाहावे.

झाला नसेल तर अजून पाच मिनिटे फ्रिझरमध्ये ठेवावा. त्यानंतर मोल्ड थोडासा ट्विस्ट व उलटा करून चॉकलेट्स काढून घ्यावीत. हवे असल्यास चॉकलेट्सना गोल्ड डस्ट लावून डिझाईन करता येईल. रंगीबेरंगी रॅपरमध्ये ही चॉकलेट्स गुंडाळून ठेवावीत.

Homemade Valentine Chocolate
Valentine’s Week: भारतातील चॉकलेट मार्केट किती मोठे आहे? व्हॅलेंटाइन डेला कोट्यवधी रुपयांचा होतो व्यवसाय

चॉकलेट करण्यासाठीच्या काही टिप्स...

  • चॉकलेट करायच्या आधी त्यासाठी लागणारी सगळी भांडी नॅपकिनने पुसून कोरडी करून घ्यावीत. कुठेही पाण्याचा अंश राहणार नाही याची काळजी घ्यावी. गरज वाटल्यास ड्रायरने ड्राय करून घ्यावीत.

  • वाफाळते गरम चॉकलेट कधीही मोल्डमध्ये भरू नये.

  • कंपाऊंड वितळल्यावर साधारण वीस मिनिटे ते त्याच स्टेजमध्ये राहते. त्यामुळे चॉकलेट घाईगडबडीने मोल्डमध्ये घालू नये.

  • आपल्या हाताच्या टेम्परेचरमुळेही चॉकलेट वितळू शकते. त्यामुळे चॉकलेट मोल्डमधून काढताना हातमोजे घालावेत. म्हणजे चॉकलेटचा आकार तसाच राहतो.

  • शक्यतो फक्त डार्क कंपाऊंड वापरून चॉकलेट करू नये, ते कडवट होते.

  • घरगुती चॉकलेट्सचा व्यवसाय करायचा असेल, मोठ्या प्रमाणात चॉकलेट्स करायची असतील, तर व्हर्जिन कोकोनट ऑइलचा वापर करावा. कंपाऊंड वितळल्यावर एका कपासाठी एक चमचा इतक्या प्रमाणात व्हर्जिन कोकोनट ऑइल घालावे. म्हणजे चॉकलेट्सना चकाकी येते आणि ती लवकर खराब होत नाहीत.

  • बाजारातून कंपाऊंड बार विकत आणल्यावर जेवढे हवे तेवढे काढून, बाकीचे लगेचच रॅप करून फ्रिजमध्ये ठेवावे. म्हणजे कंपाऊंडची चव आणि टेक्स्चर टिकून राहते.

  • फार बारीक डिझाईनचे मोल्ड घेऊ नयेत. त्यातून चॉकलेट बाहेर काढताना ते हमखास तुटू शकते.

  • तुम्ही व्यावसायिक पातळीवर चॉकलेट्स करत असाल, तर नट्स वापरून केलेल्या चॉकलेट्सच्या पाकिटावर तसे नमूद करावे. काहीजणांना नट्सची ॲलर्जी असू शकते.

  • चॉकलेट करताना ताजीच मिल्क पावडर वापरावी. शिळ्या मिल्क पावडरचा एक प्रकारचा वास चॉकलेटला लागू शकतो.

Homemade Valentine Chocolate
Valentine's Day Real Story: प्रेमाचा सण कसा झाला सुरू? वाचा 'व्हॅलेंटाईन डे'ची रंजक कहाणी
  • मोल्डमध्ये भरण्यासाठी चॉकलेट एका पायपिंग बॅगमध्ये भरून घ्यावे. बॅगला वरून गाठ मारावी. एका वेळी फार मिश्रण भरू नये. पायपिंग बॅग नसेल तर चमच्यानेही घालू शकता. पण बॅगेने सोयीचे जाते. मिश्रण मोल्डमध्ये भरून झाल्यावर त्यावरून स्क्रॅपर फिरवावे. म्हणजे जास्तीचे चॉकलेट काढले जाते.

  • फ्रिज व फ्रीझर वेगवेगळे नसतील, तर चॉकलेट सेट करायला फ्रीझरमध्ये ठेवू नयेत. मोल्डवर बर्फ साचू शकतो. अशावेळी फ्रिजमध्येच साधारण चार तास मोल्ड ठेवावा.

  • चॉकलेट वितळवताना डबल बॉइल मेथड वापरावी. या पद्धतीत गॅसवर पाण्याचे भांडे ठेवावे (अथवा आधीच पाणी उकळवून एका भांड्यात घ्यावे), त्यावर चॉकलेट ठेवलेला बाऊल ठेवावा. खालच्या भांड्यातील पाण्याला बाऊलचा तळ लागू देऊ नये. चॉकलेट ठेवलेला बाऊल डायरेक्ट गॅसवर ठेवू नये. खालच्या भांड्यातील पाणी उकळल्यावर त्याचे थेंब चॉकलेटमध्ये जाणार नाहीत याची खबरदारी घ्यावी.

(वर्षा कदम पुणेस्थित लेखिका, कवयित्री आणि हौशी फूड ब्लॉगर आहेत.)

---------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com