
Chocolate Market India: व्हॅलेंटाईन वीक उद्या म्हणजेच 7 फेब्रुवारी रोजी रोज डे पासून सुरू होत आहे. या दिवसांमध्ये फुलांपासून चॉकलेट आणि इतर अनेक गोष्टींची विक्री वाढते. 9 फेब्रुवारीला चॉकलेट डे असल्याने या दिवशी चॉकलेटला मोठी मागणी असते.
भारतातही चॉकलेटचा व्यवसाय कोट्यवधी रुपयांचा आहे. हा व्यवसाय मागणीनुसार वेगाने वाढत आहे. नेहमी चॉकलेट्सची मागणी असते मात्र व्हॅलेंटाईन वीकमध्येच कोट्यवधी रुपयांची चॉकलेट्सची खरेदी-विक्री होते.