
केतकी जोशी
लहानपणी माझ्या आजीनं मला तुळशीबागेतल्या एका भांड्यांच्या दुकानासमोर नेलं आणि म्हणाली, ‘घे, काय हवंय ते...’ माझा विश्वासच बसेना. ‘खरंच?’ मी विचारलं... ‘हो गं बाई, तुला हवी ती भातुकली घे!’ मग मी माझ्यासाठी आणि बहिणीसाठी छोटा बंब, कुकर, मिक्सर असं बरंच काय काय घेतलं. नंतर पुस्तकांच्या दुकानात जाऊन तिथेही हवी ती पुस्तकं घेतली. त्यानंतर खाऊ घेऊन आम्ही रिक्षेनं परत आलो. एरवी जवळ फारसे पैसे नसणाऱ्या माझ्या आजीकडे इतके पैसे आले कुठून?