

Vivahshastram Manpan Protocol
esakal
विवाह मंडपांमधले मानपान आणि त्यावरून होणारे मानापमान हा विषय गहनच खरा. व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने चालणारा. मानपानाला शास्त्राधार आहे की नाही यावर असंख्य विद्वान असंख्य तास चर्चा करू शकतील, वादही घालू शकतील; पण कधी घरातलं पहिलंच लग्न असतं, तर कधी शेवटचं. एखादं लग्न आजीच्या/आजोबांच्या, पणजीच्या डोळ्यांसमोर व्हायला हवं असतं. कधी नणंदबाईंचा पापड मोडतो, तर कधी आत्याबाईंचा...
आ मची सोसायटी म्हणजे विद्येच्या माहेरघराचंच एक मिनीएचर. या सव्वादोन एकरावर कितीतरी विद्वान नांदतात. विद्वानेव विजानाति विद्वज्जनपरिश्रमम् - विद्वानच विद्वानांच्या परिश्रमाची कदर करू शकतात - या न्यायाने आमच्या सोसायटीमध्ये आम्ही दर महिन्याला (सोसायटीतल्याच) एका विद्वानाशी ‘नवाचा चावा’ या मुलाखत मालिकेत गप्पा मारतो. सोसायटीतल्याच विद्वानाशी गप्पा मारण्याचे फायदे, उप-फायदे, तिप-फायदे पुष्कळ आहेत. यात नुकतीच सुप्रसिद्ध संशोधक आदित्यकेतू मोहेंजोदडोकर यांची मुलाखत झाली. त्या मुलाखतीत एक विलक्षण शोध लागला. तोच तुमच्यासाठी सगळ्यात आधी...