संपादकीय
तुमचा फोन वाजतो. पलीकडून कोणीतरी तुम्हाला तुमचंच नाव, गाव, पत्ता सांगतं. सगळा तपशील बरोबर असतो. बोलणारा माणूस स्वतःचा परिचय करून देतो दिल्ली पोलिसांतला डीसीपी किंवा सीबीआय वगैरे यंत्रणेतला बडा अधिकारी अशी.
तुमच्या नावाने पाठवलेल्या एका पार्सलमध्ये काही नको त्या गोष्टी त्यांना सापडलेल्या असतात म्हणे. तुम्ही खरंतर घाबरलेले असता; काय करायचं ते तुम्हाला सुचत नसतं. कसंतरी अडखळत तुम्ही त्या पार्सलशी तुमचा काही संबंध नाही, असं सांगण्याचा प्रयत्न करता.
पलीकडचा माणूस तुम्हाला पुन्हा तुमच्याच नावा-गावाचे तपशील सांगतो, जोडीला तो तुमच्या आधार कार्डाचा नंबरही सांगतो आणि तो बरोबर असतो.(!) असा फोन आलेल्या दहातली पाच किंवा सहा माणसं इथेच सायबर-गुन्हेगारीची शिकार झालेली असतात.