Premium|Diveagar copper plate history : दिवेआगरचा ताम्रपट; अकराव्या शतकातील मराठी, कोंकणी व कर्नाटक-संस्कृतीचा जिवंत आरसा

History of Marathi Language : दिवेआगरचा ताम्रपट अकराव्या शतकातील कोकणातील भाषिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाची महत्त्वपूर्ण माहिती देतो. मराठी भाषेची उत्क्रांती आणि महाराष्ट्र-कर्नाटक सांस्कृतिक संबंध समजून घेण्यासाठी तो महत्त्वाचा पुरावा आहे.
Diveagar copper plate history

Diveagar copper plate history

esakal

Updated on

डॉ. नागनाथ बळते

दिवेआगरचा ताम्रपट हा केवळ एक प्राचीन कोरीव दस्तावेज नसून, तो अकराव्या शतकातील कोकण प्रदेशातील भाषिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा एक जिवंत आरसा आहे. त्याच्या भौतिक स्वरूपापासून ते त्यातील भाषिक रचनेपर्यंत आणि व्यक्तिनामांच्या तपशिलापर्यंत प्रत्येक अंगाचा अभ्यास मराठी भाषेच्या उत्क्रांतीचा तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सांस्कृतिक संबंधांचा नवा दृष्टिकोन देतो.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व भाषिक इतिहासाचा अभ्यास करताना कोरीव लेख आणि ताम्रपट ही अत्यंत मूलभूत साधने ठरतात. राजाश्रयाने किंवा खासगी देणगीच्या निमित्ताने कोरले गेलेले हे लेख केवळ राजकीय घडामोडींचीच नोंद ठेवत नाहीत, तर त्या-त्या काळातील भाषेचे, समाजरचनेचे आणि नामकरण-पद्धतीचे जिवंत दस्तावेजही असतात. अशाच एका महत्त्वाच्या साधनाचे नाव म्हणजे ‘दिवेआगरचा ताम्रपट’. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात वसलेल्या दिवेआगर या गावी सापडलेला हा ताम्रपट मराठी भाषेतील सर्वात प्राचीन लेखांपैकी एक मानला जातो. त्यामुळे मराठी भाषेच्या उत्क्रांतीचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येक अभ्यासकासाठी तो एक अपरिहार्य संदर्भ ठरतो.

दिवेआगर या गावातील एका वाडीत नारळाची रोपे लावण्याचे काम सुरू असताना एका कुळवाड्याला जमिनीत गाडलेला हा ताम्रपट सापडला. ग्रामीण भागातील अशा प्रासंगिक शोधांमधून अनेकदा मोठी ऐतिहासिक साधने उजेडात येतात; दिवेआगरचा ताम्रपट हे त्याचे एक ठळक उदाहरण. हा ताम्रपट दिवेआगर येथील रहिवासी स. ना. जोशी-पटवर्धन यांच्याकडून पुढे डॉ. मो. गं. दीक्षित यांच्यापर्यंत पोहोचला. लेखातील मजकुराचे बारकाईने वाचन केल्यानंतर हा लेख दिवे गावाशीच संबंधित असल्याचे स्पष्ट झाले. त्यावरूनच त्याला ‘दिवेआगर ताम्रपट’ हे नाव देण्यात आले. या लेखाचे रोमन लिप्यंतरण आल्फ्रेड मास्टर यांनी केले असून, त्यांनी काही महत्त्वाच्या भाषाविषयक टिपाही जोडल्या आहेत, त्या लेखाच्या भाषिक अभ्यासासाठी पायाभूत ठरल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com