
मुझफ्फर खान
वर्षभरात सायकलवर पंधरा हजार किलोमीटरचा प्रवास करणे ही सहज साध्य होणारी गोष्ट नाही. पण चिपळूणच्या डॉ. मनीषा वाघमारे यांनी हे साध्य केले आहे. डॉ. मनीषा मूळच्या सोलापूरच्या. नोकरीच्या निमित्ताने त्या चिपळूणला आल्या आणि तिथल्याच झाल्या. सुरुवातीला दोन वर्षं जिल्हा शासकीय रुग्णालयात काम केल्यानंतर त्यांनी व त्यांच्या पतीने चिपळूणमध्ये स्वतःचे रुग्णालय सुरू केले. सुरुवातीचा प्रवास अत्यंत खडतर होता, कारण शून्यातून सुरुवात होती. पण चिपळूणने साथ दिली.