कणकेचे फ्राईड मोमो, विदर्भ स्पेशल कढी गोळे, व्हेज बार्बेक्यू खानदेश आणि स्पेशल फुनके!

बनवा चमचमीत आणि झणझणीत रेसिपी
momo
momoEsakal

कणकेचे फ्राईड मोमो (Dough Fried Momos)

साहित्य

एक पत्ता कोबी बारीक चिरून, ४ वाट्या गव्हाचे पीठ, २ गाजरे बारीक चिरून, २ चमचे आले-लसूण पेस्ट, मीठ चवीनुसार, २ चमचे तिखट, तेल.

कृती

गव्हाचे पीठ मळून वीस मिनिटे बाजूला ठेवून द्यावे. तोपर्यंत मोमोंचे सारण तयार करून घ्यावे. सुरुवातीला कढईमध्ये २ चमचे तेल तापवावे. तेल गरम झाले, की त्यात बारीक चिरलेला कोबी घालून मंद विस्तवावर परतून घ्यावा. त्यानंतर गाजर, मीठ घालून परतून घ्यावे.

कढईवर झाकण ठेवून एक वाफ येईपर्यंत मंद विस्तवावर भाज्या शिजवून घ्याव्यात. भाज्या जास्त मऊ शिजवू नयेत. त्यानंतर त्यामध्ये आले-लसूण पेस्ट, मीठ, तिखट घालून मिक्स करावे व गॅस बंद करावा. त्यानंतर मोमोसाठी मळलेले पीठ पुरीच्या आकारात लाटावे. त्या पुरीमध्ये तयार सारण भरून त्याला मोदकासारखा आकार द्यावा. तयार मोमो वाफवून घ्यावेत.

वाफवून झाल्यानंतर १५ मिनिटे गार होण्यासाठी ठेवावे. गार झाल्यानंतर कढईमध्ये पुरेसे तेल घेऊन गरम तेलात मोमो तळावेत आणि शेजवान चटणीबरोबर सर्व्ह करावेत.

kadhi gole
kadhi goleEsakal
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com