

Indian Rock Cut Caves and Dravidian Architecture
esakal
वरूण परब
जवळचे शहर : मुंबई
जवळचे विमानतळ : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ
जवळचे रेल्वेस्थानक : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
जवळची फेरी : गेटवे ऑफ इंडिया
केव्हा जाल? : नोव्हेंबर ते फेब्रुवारी
वारसास्थळाची वैशिष्ट्ये : मुंबई शहरापासून ११ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या घारापुरी नावाच्या बेटावर वसलेला हा शैवपंथीय लेणीसमूह. या बेटाचे प्राचीन नाव अग्रहारपुरी आणि श्रीहरी असे होते. पुढे पोर्तुगीज या बेटावर आले असता त्यांना इथे प्रचंड मोठे हत्तीचे शिल्प सापडले, ज्यावरून त्यांनी या बेटाचे नामकरण ‘एलिफंटा’ केले. सध्या हा दगडी हत्ती भाऊ दाजी लाड संग्रहालयाच्या बाहेर ठेवला आहे. ही लेणी इ. स. पाचव्या ते सहाव्या शतकात कोरली गेली असावीत, असे अनुमान आहे. आकाराने हा समूह गणितातील अधिक चिन्हासारखा आहे. येथील लेण्यांची रचना वेरूळमधील दुमार लेण्यांसारखी आहे. ह्या लेण्यांमध्ये भगवान शंकराशी निगडित अनेक पौराणिक कथांवर आधारित शिल्पे आहेत. त्रिमूर्ती, अर्धनारीश्वर, गंगावतरण, शिवपार्वती विवाह, अंधकासुरवधमूर्ती, उमामहेश्वर, तांडवनृत्य, रावणानुग्रह आणि इतर अनेक भव्यदिव्य शिल्पे येथे पाहावयास मिळतात. यातील मुख्य लेण्यातील त्रिमूर्ती शिल्प लक्षवेधक आहे. ब्रह्मा, विष्णू व शिव यांचे अनुक्रमे जन्मदाता, त्राता आणि संहारक अशा रूपांमध्ये शिल्पांकन केले आहे. या त्रिमूर्तीच्या एका बाजूस अर्धनारीश्वराचे शिल्प, तर दुसऱ्या बाजूस गंगावतरणाचे शिल्प आहे. दुर्दैवाने या समूहातील काही शिल्पे छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळतात. हे बेट पोर्तुगिजांच्या अमलाखाली असताना पोर्तुगीज सैनिक इथल्या शिल्पांवर नेमबाजीचा सराव करायचे. भारतीय पुरातत्त्व विभागाने या लेणीसमूहाच्या संवर्धनासाठी विशेष मोहीम राबविली, त्यामुळे आज एलिफंटा लेणी सुस्थितीत आहेत.