Premium|European Peace Project : रुसो, पेरी आणि अतातुर्क यांच्या विचारांतून दिसणारा जागतिक बदलांचा प्रवास

Rousseau and Perry Debate : युरोपीय शांतता संघराज्याच्या कल्पनेत तुर्कस्तान, इस्लामी जग आणि आधुनिकतेचा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. पेरी, रुसो, अतातुर्क आणि हंटिंग्टन यांच्या विचारांमधून जागतिक राजकारणाचे बदलते स्वरूप उलगडते.
European Peace Project

European Peace Project

esakal

Updated on

डॉ. सदानंद मोरे

व्हॉनने केलेल्या रुसोच्या (अर्थात पेरीच्या) पुस्तकाच्या अनुवादाचे प्रकाशन वर्ष १९१७ आहे. यादरम्यान युरोपात पहिले महायुद्ध सुरू होऊन आता पारडे इंग्लंड-अमेरिका म्हणजे दोस्त राष्ट्रांकडे झुकू लागल्याचे चित्र दिसू लागले होते. विशेषतः अमेरिका अलिप्ततेचे धोरण त्यागून युद्धात उतरल्यामुळे युद्धामुळे काय नुकसान होते याचा अनुभव सारे जग तेव्हा घेत होते.

पेरीच्या युरोपीय संघराज्य किंवा राज्यसंघ आणि शाखा शांतता योजनेच्या आणखी तपशिलात जाण्याची गरज नाही. त्याने युरोपातील प्रत्येक राज्याचा स्वतंत्र विचार केला आहे एवढे सांगणे पुरेसे ठरावे.

पेरी प्रकल्पाबद्दल खूप चर्चा झाली आहे. पण या चर्चेतूनही एक महत्त्वाची बाब सुटली आहे, तिच्याकडे लक्ष वेधायला हरकत नसावी. पेरीला युरोपातील ज्या राष्ट्रांचा संघ निर्माण करून शांतता प्रस्थापित करायची आहे, ती अर्थातच धर्माने ख्रिस्ती आहेत. मात्र त्यांच्या कोणत्याही योजनेत व्यत्यय आणू शकेल असे सामर्थ्य असलेले राष्ट्र दुर्लक्षित ठेवून चालणार नाही. हे राष्ट्र ख्रिस्ती नाही, मुसलमानांचे आहे व ते सर्व युरोपला पुरून उरून साम्राज्य झाले आहे. त्याचे काय करायचे याचाही विचार करायला हवा. पण तो करताना त्याचे स्वरूपही नीटपणाने समजून घ्यायला हवे. येथेही पेरी कर्तव्याला चुकत नाही. ते राष्ट्र म्हणजे तुर्कस्तान किंवा तुर्की. पेरीचे तुर्कीसंबंधित निरीक्षण पुढीलप्रमाणे आहे. अर्थात ते तुर्कस्तान सोडून शिवाय अन्य इस्लामी राष्ट्रांनाही लागू पडते - ‘Everybody knows that the chief reason why the Mohometan sovereigns do not build colleges, nor encourage their subject to the study of the sciences, and of liberal arts, is their fear of schems and wars, which the disputes of theologians often occasions. Hitherto it has been their opinion, that nothing but profound ignorance could secure them against those misfortuners, but soon as they should find their being in association with European Society, they should have a security for preservation of peace both without and within their dominion, it is probable they would soon follow the method of Chirstian Countries with education of youth, and advancement of arts and Scinece.’

European Peace Project
Premium|Court Story : अल्पवयीन मुलीशी शरीरसंबंध..पोक्सो कायदा आणि कोर्टरूम नंबर ४०..! नेमकं काय घडलं..?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com