Premium|Historic Clock Towers : जगप्रसिद्ध घड्याळांच्या गोष्टी...

Big Ben: London’s Iconic Clock Tower : मुंबईच्या राजाबाई क्लॉक टॉवरपासून लंडनच्या बिग बेनपर्यंत ही ऐतिहासिक घड्याळे केवळ वेळ सांगत नाहीत, तर शहरांचा इतिहास, संघर्ष, बदल आणि संस्कृतीच्या आठवणी जपतात.
Big Ben: London’s Iconic Clock Tower

Big Ben: London’s Iconic Clock Tower

esakal

Updated on

निकेतन बाळासाहेब कदम

शहरांत उभे असलेले घड्याळ केवळ यंत्र नव्हते, तर ते शहरांचे स्पंदन होते. क्रांती आणि सत्तांतरे, सण-उत्सव आणि निरोप यांचे मूक साक्षीदार होते. अशी प्रसिद्ध घड्याळे तयार करणारे कलाकार आज पडद्याआड गेले असले, तरी ही घड्याळे येणाऱ्या प्रत्येक पिढीशी हितगूज साधतात. घड्याळाचा प्रत्येक ठोका एका गोष्टीची सतत आठवण करून देतो, की वेळेचा प्रवाह अखंड वाहत आहे.

राजाबाई क्लॉक टॉवर, मुंबई

मुंबईतील फोर्ट भागातील हे घड्याळ इतिहासाची साक्ष देते. मुंबईतील भव्य इमारतींच्या क्षितिजावर उभा असलेला हा मनोरा स्वातंत्र्यलढ्याच्या काळाची आठवण करून देतो. व्हिक्टोरियन गॉथिक शैलीत १८६९ ते १८७८ या काळात हे घड्याळ बांधले गेले. हे घड्याळ बांधताना प्रेमचंद रॉयचंद या धनिकाने आर्थिक योगदान दिले. त्यामुळे यांच्या आईचे नाव या घड्याळाला दिले गेले. हा क्लॉक टॉवर जागतिक वारसास्थळाच्या यादीत समाविष्ट आहे. गेली कित्येक दशके वेगाने विस्तारणाऱ्या मुंबई शहराची प्रगती या मनोऱ्याने पाहिली आहे.

बिग बेन, लंडन

इतर कोणत्याही घड्याळांपेक्षा प्रसिद्ध असणारे हे घड्याळ आहे. ‘बिग बेन’ हे नाव संपूर्ण मनोऱ्याचे नसून, केवळ त्यातील मोठ्या घंटेचे आहे. परंतु, काळाच्या ओघात हे नाव संपूर्ण वास्तूलाच मिळाले आहे. गॉथिक रिव्हायव्हल शैलीतील या घड्याळाचा पहिला टोला पडला ३१ मे १८५९ रोजी. पॅलेस ऑफ वेस्टमिन्स्टरच्या शेजारी उभे असलेले बिग बेन दीडशेहून अधिक वर्षांपासून ब्रिटनच्या विजयांचा आणि दुःखद प्रसंगांचा साक्षीदार आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात बॉम्बस्फोटांनी लंडन शहर होरपळून निघाले होते, तेव्हा बिग बेनच्या जवळ उभ्या असलेल्या इमारतींचेही प्रचंड नुकसान झाले. परंतु तेव्हाही त्याचा घंटानाद अखंड सुरूच होता. तेव्हापासून घड्याळाचे ठोके धैर्य, चिकाटी आणि संकटांवर मात करण्याच्या अदम्य जिद्दीचे प्रतीक झाले. बिग बेनच्या घंटानादाचे पहिले रेडिओ प्रसारण १९२३च्या नववर्षाच्या पूर्वसंध्येला झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com