

Fashion Comfort
esakal
धनश्री काडगांवकर
फॅशनला वयाचं कोणतंही बंधन नसतं असं मी मानते. वय झालं म्हणून आता साडीच नेसली पाहिजे किंवा विशिष्ट प्रकारचेच कपडे घातले पाहिजेत, यावर माझा विश्वास नाही. तुमचं वय काहीही असलं, तरी तुमची इच्छा असेल आणि तुम्ही ते कपडे छान कॅरी करू शकत असाल, तर तुम्ही ते नक्कीच घालावेत. कारण कोणतीही गोष्ट जर नीट कॅरी केली, तर ती नक्कीच सुंदर दिसते. फॅशन म्हणजे नक्की काय असतं? तर माझ्या मते फॅशन म्हणजे सर्वात आधी स्वतःला कम्फर्टेबल वाटणं. तुमच्या शरीराला नेमकं काय सूट होतंय, तुमचा ‘बॉडी टाइप’ काय आहे आणि त्यामध्ये तुम्ही स्वतःला कसं पाहता, यानुसार जर फॅशन केली, तर पूर्ण आत्मविश्वासाने ती नक्कीच करावी आणि मीदेखील हेच मानते.