Premium|FIFA World Cup global business : फिफा विश्वकरंडक; फुटबॉलपलीकडे अब्जावधींचा जागतिक व्यवसाय

Economic Impact of FIFA World Cup : फिफा विश्वकरंडक स्पर्धा ही केवळ फुटबॉलपुरती मर्यादित नसून प्रसारण हक्क, प्रायोजकत्व आणि जागतिक लोकप्रियतेमुळे अब्जावधी डॉलर्सची आर्थिक उलाढाल करणारी महत्त्वाची क्रीडा स्पर्धा बनली आहे.
FIFA World Cup global business

FIFA World Cup global business

esakal

Updated on

जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये वेगवेगळ्या वाहिन्यांद्वारे प्रसारित केले जाणारे थेट प्रक्षेपण, त्याला मिळणारा प्रचंड प्रतिसाद आणि हे लक्षात घेऊन या प्रक्षेपणाचे हक्क मिळवण्यासाठी दिसून येणारी अहमअहमिका, हे सारे लक्षात घेतले तर फिफा विश्वकरंडक स्पर्धा हे केवळ मनोरंजनाचे साधन राहिले नसून, आता ही स्पर्धा म्हणजे प्रचंड आर्थिक उलाढाल असलेली क्रीडा स्पर्धा झाली आहे. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा म्हणजे संयोजकांसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे, असे म्हटले तर ते फारसे वावगे ठरणार नाही‌.

आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघातर्फे (फिफा) आयोजित केली जाणारी फिफा विश्वकरंडक स्पर्धा ही जगातील सर्वात श्रेष्ठ स्पर्धा मानली जाते. किंबहुना, फुटबॉलपटू, प्रशिक्षक आणि संघटकही ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांपेक्षाही जास्त महत्त्व या स्पर्धेला देत असतात. महासंघाच्या दोनशेहून अधिक सदस्य देशांमध्ये या स्पर्धेतील सामन्यांचा प्रत्यक्ष उपस्थित राहून आनंद घेणाऱ्यांची संख्याही लाखांच्या घरात असते, तसेच या सामन्यांचे थेट प्रक्षेपण दाखवले जात असल्यामुळेच ही स्पर्धा जगातील सर्वात लोकप्रिय स्पर्धा मानली जाते. त्यामुळेच या स्पर्धेचे प्रायोजक होण्यासाठी बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये खूपच चढाओढ दिसून येत असते. साहजिकच ही स्पर्धा आयोजित करणे हा एक प्रकारचा व्यवसायच झाला आहे. या स्पर्धेच्या संयोजनपदासाठीदेखील अनेक देशांमध्ये चुरस असते; संयोजनपद मिळवण्यासाठी सदस्य देशांना वेगवेगळ्या प्रकारची प्रलोभने दाखवण्याचे प्रकारही घडले आहेत.

ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेप्रमाणेच फिफा विश्वकरंडक स्पर्धेलाही इतिहास आहे. सन १९३०पासून पुरुषांची विश्वकरंडक स्पर्धा दर चार वर्षांनी आयोजित केली जाते. १९५४पासून या स्पर्धेचे प्रक्षेपण दूरचित्रवाणीद्वारे करण्यास सुरुवात झाली आणि तेव्हापासूनच अनेक देशांमध्ये फुटबॉलप्रेमी अगदी घरात बसूनही या स्पर्धेचा आनंद घेत असतात. महिलांच्या विश्वकरंडक स्पर्धेस १९९१पासून प्रारंभ झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com