Premium|Film Editing : चित्रपट संकलनाचा ‘कात्री’शीर जादूई प्रवास; दृश्य, ध्वनी आणि मोन्ताजातून कथेला नवा वेग

The Art and Importance of Film Editing : चित्रपट संकलन म्हणजे केवळ दृश्ये जोडणे किंवा चुका लपवणे नव्हे; चित्रीकरणातील अनावश्यक भाग दूर करून कथा, भावना आणि अर्थाला योग्य आकार देणारी सर्जनशील कला आहे.
The Art and Importance of Film Editing

The Art and Importance of Film Editing

esakal

Updated on

डॉ. केशव साठ्ये

संकलनाच्या टप्प्यात दिग्दर्शकाचे सर्व कौशल्य पणाला लागते. संकलन हे चित्रीकरणातील चुका झाकण्यासाठीचे साधन नव्हे, तर त्या चित्रीकरणातून नेमका अर्थपूर्ण आशय निर्माण करण्याचे साधन आहे. कधी संगीताच्या तुकड्यातून, कधी मोठा क्लोजअप वापरून, कधी दृश्याशी साधर्म्य पावणारे रूपक वापरून हा परिणाम साधता येतो.

सन १९६७मध्ये १३ ऑगस्ट या दिवशी बॉनी ॲण्ड क्लाईड हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यात डीडी ॲलन या ख्यातनाम स्त्री संकलकाचा श्रेयनामावलीत पहिल्यांदाच स्वतंत्र मथळा देत गौरव करण्यात आला. त्यामुळे १३ ऑगस्ट हा दिवस जागतिक चित्रपट संकलक दिवस (फिल्म एडिटर डे) म्हणून साजरा केला जातो. सिनेमा या अद्‍भुत कलेमध्ये संकलनाचे स्थान अधोरेखित करण्यासाठी जगभरात या दिवशी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. चित्रपटाच्या कथेला आकार देणाऱ्या, अनावश्यक दृश्यांना कात्रीत पकडणाऱ्या कलेचे सामर्थ्य ज्या दिग्दर्शकाच्या लक्षात येते, त्याच्या हातून सर्जनशील चित्रपटनिर्मिती होते, हा इतिहासही आहे आणि चित्रपटविश्‍वाचे भविष्यही आहे!

एखादा शिल्पकार दगडात मूर्ती घडवितो, म्हणजे  नेमके काय करतो, तर तो त्या दगडातील नको असलेला भाग काढून टाकतो आणि त्याच्या मनःचक्षूसमोर असलेली प्रतिमा साकारतो.  संकलन कलाही अशीच आहे.  आशय पडद्यावर नीटपणे मांडण्यापूर्वी  चित्रीकरणात असलेले आणि कथानकाला पुढे नेण्यास अडथळा निर्माण करणारे काही घटक बाजूला करण्याचे काम एडिटर  करतो. प्रतिभावंत दिग्दर्शकाच्या डोक्यात चित्रपट तयार असतो. मात्र एडिटरच्या मदतीने तो साकार होतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com