

Flat Earth Theory
esakal
रवि आमले
षड्यंत्र सिद्धांतकारांचे सगळे दावे प्रत्यक्ष अनुभव, प्रत्यक्ष प्रमाण, तर्क, विज्ञान यांच्या कसोट्यांवर फेटाळून लावता येतात. उदाहरणार्थ, क्षितिज का सरळ रेषेत दिसते, तर पृथ्वीचा परीघ एवढा मोठा आहे, की कमी अंतरावरून तिचा वक्राकार लक्षात येणे कठीण आहे. पण अंतराळातून काढलेल्या छायाचित्रांतून तो दिसतो. पृथ्वी सपाट असती, तर उत्तर आणि दक्षिण गोलार्धातील लोकांना एकसारखेच तारे दिसले असते.