Folk Musical Instruments Indian Culture Tradition
Esakal
सायली पानसे-शेल्लीकेरी
लोकवाद्ये तयार करणे ही एक कलाच आहे. अनेक वेळा कारागीर स्वत: जंगलातून बांबू, लाकूड, माती, प्राण्यांची कातडी आणून वाद्ये तयार करतात. त्यात कोणतेही यांत्रिक तंत्र नसून, आवाजात प्राण ओतणारी संवेदना असते. प्रत्येक वाद्याचा आवाज, वाद्याची लांबी, रुंदी, वापरलेले साहित्य हे सगळे त्या प्रदेशाच्या हवामानानुसार ठरते.
भारत हा विविधतेने नटलेला बहुरंगी संस्कृतीचा देश. इथल्या प्रत्येक प्रांताला, भाषेला, परंपरेला आणि पोशाखाला स्वतःचा खास ठसा आहे. या भिन्नतेत विणला गेलेला समान धागा म्हणजे संगीत. संगीत भारतीय संस्कृतीचे हृदय आहे आणि या संगीताला आत्मा देणारा घटक म्हणजे लोकवाद्ये.