Premium|French Open 2026 : फ्रेंच ओपनमध्ये झ्वेरेव-अँड्रीवाचे वर्चस्व, नव्या युगाची सुरुवात

Zverev Ends Grand Slam Drought : फ्रेंच ओपनमध्ये अलेक्झांडर झ्वेरेव आणि मिरा अँड्रीवा यांनी पहिले ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावत टेनिसमध्ये नव्या युगाची घोषणा केली. दोघांनीही अंतिम सामन्यांत दमदार कामगिरी करत इतिहास रचला.
Zverev Ends Grand Slam Drought

Zverev Ends Grand Slam Drought

esakal

Updated on

किशोर पेटकर

पॅरिसमध्ये ॲलेक्झांडर झ्वेरेव या जर्मन खेळाडूने निर्णायक टप्प्यावर एकाग्रता भंग होऊ दिली नाही. दोन वर्षांपूर्वी हुकलेले विजेतेपद साध्य केले. म्युनिक, माद्रिद, इटालियन ओपनमध्येही या जर्मन खेळाडूला लौकिकास साजेसा खेळ करता आला नव्हता. फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम त्याच्यासाठी आगामी कारकिर्दीत नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

पॅरिसमधील क्ले कोर्टवरील फ्रेंच ओपनमध्ये यंदा नवसाम्राज्याची स्थापना झाली. पुरुष व महिला एकेरीत ग्रँडस्लॅममधील नवे विजेते स्थापित झाले. जर्मनीचा ९ वर्षीय ॲलेक्झांडर झ्वेरेव याने यापूर्वीच्या तीन ग्रँडस्लॅम स्पर्धांमधील अंतिम फेरीतील अपयश भरून काढत पहिलेच विजेतेपद साकारले. इटलीचा २४ वर्षीय फ्लावियो कोबोली याला त्याने पाच सेट्समध्ये पराभूत केले. यापूर्वी तीन वेळा ग्रँडस्लॅम अंतिम फेरी गाठूनही झ्वेरेवला उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले होते. त्याला अंतिम लढतीत २०२०मधील अमेरिकन ओपनमध्ये डॉमनिक थिएमने, २०२४मधील फ्रेंच ओपनमध्ये कार्लोस अल्काराझने, तर २०२५मधील ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये यानिक सिनरने हरविले होते. यावेळेस जर्मन टेनिसपटूने आपल्यापेक्षा वयाने पाच वर्षे लहान असलेल्या प्रतिस्पर्धकाला वरचढ होऊ दिले नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com