Ganesh Chaturthi 2023 Special
Ganesh Chaturthi 2023 Special esakal

Ganesh Chaturthi 2023 Special : देशोदेशीचे गणपती : फिलाडेल्फिया गणेश फेस्टिवल

नॉर्थ अमेरिकेतला पहिला सार्वजनिक गणपती फिलाडेल्फियाजवळच्या भारतीय टेम्पलमध्ये २००५मध्ये बसवला.

- कीर्ती श्रीखंडे

Ganesh Chaturthi 2023 Special Article Gapapti Bappa : अनेक कारणांनी आपण आपला देश सोडून दुसऱ्या देशात स्थलांतरित होतो, पण आपण आपली संस्कृती, सण विसरत नाही. हीच भावना फिलाडेल्फिया भागात राहणाऱ्या अनेक लोकांची होती. म्हणूनच १८ वर्षांपूर्वी फिलाडेल्फिया मराठी मंडळ आणि भारतीय टेम्पल कार्यकारिणीने ‘फिलाडेल्फिया गणेश फेस्टिवल’चा (PGF) विडा उचलला आणि आज १४ अमराठी मंडळांच्या साथीने हे फेस्टिवल अविरत चालू आहे.

नॉर्थ अमेरिकेतला पहिला सार्वजनिक गणपती फिलाडेल्फियाजवळच्या भारतीय टेम्पलमध्ये २००५मध्ये बसवला. आधी छोटेखानी असलेल्या उत्सवाचे स्वरूप आता खूप मोठे झाले आहे. दर वर्षी दहा हजारांपेक्षा जास्त लोक ह्या फेस्टिवलला भेट देतात. मुंबईच्या सिद्धिविनायक ट्रस्टने मानाचा व्यास पुरस्कार देऊन ह्या फेस्टिवलचा गौरव केला आहे. 

Also Read - ‘फेलिचे’ : एका अनोख्या चवीचा प्रवास....

Ganesh Chaturthi 2023 Special Article Gapapti Bappa
Ganesh Chaturthi 2023 Special Article Gapapti Bappa

गणेशोत्सवाच्या तीन-चार महिने आधी सगळे कार्यकर्ते कामाला लागतात. तेरा समित्यांचा समन्वय साधण्यासाठी दोन मराठी आणि दोन अमराठी सभासदांची एक कोअर टीम असते. प्रत्येक कोअर मेंबर चार-पाच कमिट्यांना  सहकार्य करतो आणि बाकीच्या मेंटॉर व  कार्यकर्त्यांच्या मदतीने संपूर्ण फेस्टिवलचे आयोजन करतो. हे सगळे कार्य फक्त आणि फक्त तीनशे-चारशे कार्यकर्त्यांच्या आणि देणगीदारांच्या सहकार्याने चालले आहे.

सुंदर मिरवणूक काढून ढोल-ताशा आणि लेझीमच्या तालात आम्ही बाप्पाचे स्वागत करतो. मिरवणुकीत सहा-सात नृत्ये असतात. ह्यात स्थानिक कलाकारांना त्यांची कला दाखवण्याची संधी मिळते. रोज सगळ्या भक्तांसाठी विनाशुल्क महाप्रसाद असतो. हा महाप्रसाद काही स्थानिक मित्रमंडळींचे ग्रूप, काही स्थानिक संस्था किंवा काही कुटुंब रोजच्या रोज ताजा करतात.

दहा दिवस हा प्रसाद कसा वाटायचा हे खूप महत्त्वाचे काम आमची फूड कमिटी लीलया करते आणि कोणीही प्रसाद घेतल्याशिवाय जाणार नाही ह्याची काळजी घेते, कारण हे घरचेच कार्य असते.

Ganesh Chaturthi 2023 Special Article Gapapti Bappa
Ganesh Chaturthi 2023 Special Article Gapapti Bappa

बाप्पाची मूर्ती, पूजाअर्चा ही कामे रिलिजस कमिटीची. उत्सवासाठी गणपतीची मूर्ती फक्त शाडूचीच आणली जाते. बाप्पाला रोज नवीन वस्त्रे, हारतुरे आणि दागिने घातले जातात. सगळे हार कार्यकर्तेच तयार करतात.  उत्सवकाळात मंदिरात रोज महाआरती होते. आरतीची पुस्तके वाटली जातात आणि मोठ्या जल्लोषात रोज आरती होते.

Ganesh Chaturthi 2023 Special
Ganesh Chaturthi 2023 : 'अल्लु तुझी लेक तुझ्यासारखीच कलाकार'! आरहानं तयार केलेला बाप्पा नेटकऱ्यांच्या कौतुकाचा विषय

गेल्या दोन वर्षांपासून लहान मुलांकडून गणेश पूजा करून घेतली जाते, ज्यायोगे येथे वाढणाऱ्या मुलांना आपल्या संस्कृतीबद्दल आपुलकी निर्माण होईल आणि नवीन पिढीसुद्धा पुढे ह्या उत्सवात हिरिरीने भाग घेईल. उत्सवात गणेश विवाह सोहळादेखील संपन्न होतो. महाराष्ट्रीय पद्धतीने गौर बसवली जाते. गौरीचे हळदी कुंकू करतात. 

उत्सवकाळात अनेक मोठे कलाकार येथे येतात. पंडित अमजद अली खान, पं. एल. सुब्रह्मण्यम, पं. अजोय आणि पं. कौशिकी चक्रवर्ती, राहुल देशपांडे, महेश काळे, राजन-साजन मिश्रा, पं. सुरेश वाडकर, नंदेश उमप यांनी येथे येऊन त्यांची कला सादर केली आहे. कुठलेही शुल्क न आकारता सगळे कार्यक्रम छान पार पडतात. याचे सगळे श्रेय आमच्या देणगीदारांना आणि होस्ट ॲण्ड हॉस्पिटॅलिटी कमिटीला जाते. 

Ganesh Chaturthi 2023 Special
Ganesh Chaturthi 2023 : गणपती बाप्पाचा जन्म कसा झाला? जाणून घ्या कथा

 दोन दिवस इंडिया फेस्टमध्ये स्थानिक आणि आजूबाजूच्या राज्यातून आलेल्या छोट्या व्यावसायिकांना स्वतःचे स्टॉल टाकण्याची संधी दिली जाते. शेकडो गाड्या रोज येतात आणि त्यांची पार्किंगची व्यवस्था पार्किंग कमिटी उत्तमपणे सांभाळते. मंदिरात जर पार्किंग उपलब्ध नसेल तर जवळच्या शाळेत पार्क करून शटलने लोकांना ने-आण केले जाते. 

दहा दिवस मुद्रा (स्थानिक शास्त्रीय नृत्याचे परफॉर्मन्स), गणरंग (नृत्याची स्पर्धा), विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम असतात. दरवर्षी आमच्या ह्या फेस्टिवलची लोकप्रियता वाढतच आहे. अशीच कृपा कायम राहू देत हीच बाप्पाचरणी प्रार्थना!

Ganesh Chaturthi 2023 Special
Ganesh Chaturthi 2023 Recipes मोदकाच्या आमटीची रेसिपी, पाहा VIDEO

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com